बदलापूर! विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधाना विरोधात गरळ ओकणाऱ्या एका महिलेला नेरळ पोलिसांनी केली अटक,, ( एक हरामखोर बदलापुर मध्ये)

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि संविधानाच्या विरोधात आणि बौद्ध धर्माच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या एका महिलेला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे, आशा अनंत राणे असे या महिलेचे नाव असून ती कर्जत तालुक्यातील नेरळ ह्या ठिकाणी राहणारी महिला आहे, आशा राणे हिने काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल करुन त्या मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधाना बाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे,या मुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे,
आशा राणे हिने आपल्या सडक्या मेंदुतन डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ बाबासाहेब यांनी अथक परिश्रमाने लिहिलेल्या संविधाना बाबत गरळ ओकली आहे,आशा राणे ही एक शिक्षिका असल्याचे समजते, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मंजूर करण्यासाठी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला होता, हिंदू कोड बिल मध्ये स्री आणि पुरुषाला बरोबरीचा अधिकार मिळाला पाहिजे असा आग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धरला होता, महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार,बाळंतपणा साठी भरपगारी सुट्टी, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, राजकीय क्षेत्रातील आरक्षण, या साठी संघर्ष करुन भारतीय राज्यघटने मध्ये तसी तरतूद करुन ठेवली, आणि आज महिला संरपंचा पासून ते थेट राष्ट्रपती पदावर पोहचल्या आहेत,खर तर देशातील प्रत्येक महिलेने आपल्या घरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावुन त्यांचे नित्यनेमाने दर्शन घेतले पाहिजे, परंतु जातीवादाने बरबटलेल्या अशा सडक्या मेंदुच्या महिला या समाजा मध्ये आहेत तो पर्यंत या देशात जाती भेदातुन संघर्ष हा होतच राहणार आहे,याच महिलेचा बदलापुर मध्ये राहत असलेला सडक्या मेंदुचा भाऊ असलेला प्रल्हाद राणे याने देखील हिच पोस्ट आपल्या फेसबुकवर व्हायरल करुन समाजामध्ये जातिय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, आशा राणे हिच्यावर नेरळ पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे, परंतु आता बदलापूर मध्ये राहणाऱ्या ह्या गटार किड्यांना अटक करण्याची मागणी करत आज बदलापूर शहरातील अनुयायांनी बदलापुर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले आहे, बदलापुर ग्रामीण पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून आंबेडकरी अनुयायांनी प्रल्हाद राणे याला तातडीने अटक करून त्यच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तातडीने कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा आंबेडकरी संघटनांनी दिला आहे,, बदलापुर ग्रामीण पोलिसांनी या बाबत गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करणे गरजेचे आहे,