अखेर रिपब्लिकन सेनेच्या निवेदनाची दखल घेऊन सिनखेडराजा ठाणेदार केशव वाघ यांची बदली.
दि 10/9/2023 चिखली ता.( प्रतिनिधी )

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील बामखेडा या गावांमध्ये बौद्ध व सवर्ण समाजामध्ये हाणामारी झाली होती त्यात बौद्ध समाजाच्या महिला भगिनी चे डोके फुटून त्यांना जबरदस्त मार लागलेला होता, दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये भाजपा सरकार आल्यापासून मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचाराचे, बलात्काराचे कित्येक किस्से आपल्याला प्रसार माध्यमातून ऐकायला आणि पाहायला मिळतात या अनुषंगाने रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेश उपाध्यक्ष भाई दिलीप खरात ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराचे प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी ते तत्पर असतात मात्र अशातच सिंदखेडराजा तालुक्यातील बामखेडा गावामध्ये बौद्ध आणि सवर्ण समाजामध्ये हाणामारीचा प्रकार घडल्यामुळे या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये गेले असता,,,
तेथील जातीवादी ठाणेदार केशव वाघ यांनी सदर प्रकरण मिटवून घेण्यासाठी क्रॉस तक्रार दाखल करून बौद्ध महिला व पुरुष लोकांना टारगेट केले त्याचा जाब विचारण्यासाठी संबंधितावर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते परंतु संबंधित जातीवादी ठाणेदार केशव वाघ यांनी दिलीप भाई खरात यांना अपमानास्पद वागणूक दिली होती तुम्ही महाराचे लीडर लय माजलेत तुमची औकात नाही इथे यायची तुम्ही मेलेले बरे असे बोलून तुच्छ शब्दाने हिनवले पोलीस ठाण्यामध्ये आपल्या समाजाला न्याय मिळत नसल्यामुळे दिलीप भाई खरात यांनी पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले या घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना सिंदखेडराजा ठाणेदार केशव वाघ यांनी केलेल्या जातीवादी कृत्यामुळे हा प्रकार घडला असून सिंदखेडराजा पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर असलेले ठाणेदार केशव वाघ यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे असे निवेदन सात सप्टेंबर रोजी दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी 9 सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा येथील ठाणेदार यांची तात्काळ बदली केली अखेर रिपब्लिकन सेनेच्या निवेदनाला यश आले