सातबाऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी मागितली लाच लाचखोर मंडल अधिकारी, खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात येवला तालुक्यात खळबळ ,
नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक -:नाशिक जिल्ह्यासह जिल्ह्यातील तालुके व विविध अधिकारी सतत कोण्यात्याही लाचप्रकरणी कायम आघाडी वर रहात असुन त्यात खंड पडण्याचे चिन्ह दिसत नाही त्यात भरीत भर येवला तालुक्यातील महसुल मंडळ अधिकारी वर्ग ३ चे लोकसेवक श्री पांडुरग हांडु कोळी वय ५७ राहणार सावरगाव तालुका येवला व आरोपी श्री विठोबा जयराम शिरसाठ वय ३२ राहणार ठाणगाव तालुका येवला यांनी सातबाऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने अटक केली आहे
श्री पांडुरंग कोळी वर्ग तीनचे मंडल अधिकारी आहे श्री. विठोबा शिरसाठ हा शेतमजुरी करतो. तक्रारदारांच्या आईचे नाव लक्ष्मी मुक्ती या शासकीय योजने अंतर्गत वडिलांचे सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मंडळ अधिकारी श्री पांडुरंग कोळी यांनी बुधवारी (दिना़ंक ६ रोजी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ९ हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने शहानिशा केली. नाशिक परीक्षेञाच्या पोलिस अधिक्षक लाचुचपत विभाग मा श्रीमती शमिॅष्ठा घारगे वालावकर,तसेच मा श्री माधव रेड्डी सो अपर पोलिस अधिक्षक नाशिक विभाग,मा ़श्री नरेन्द्रं पवार पोलिस उप अधिक्षकलाचलुचपत नाशिक विभाग ,याचें मार्गदर्शनाखाली सापळाधिकारी श्रीमती मिरा अदमाने पोलिस निरीक्षक लाचलुचपत नाशिक याच्या सुचनेनुशार पथक पोलिस श्री प्रविण महाजन,पोलिस श्री किरण अहिरराव,पोलिस श्री प्रमोद चव्हाणके,पोलिस श्री परसराम जाधव यांनी लाचेची रक्कम कोळी यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती विठोबा जयराम शिरसाठ याने गुरुवारी दिनाक ७ रोजी स्वीकारली. ही लाच घेतल्याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे