दैनिक सम्राटचे संपादक बबनराव कांबळे काळाच्या पडद्याआड.! लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली
( तात्यासाहेब सोनावणे याज कडून)

“मूकनायक” नंतर दैनिक नवाकाळ मधून परखड लिहित,मोठ्या वृक्षाखाली छोटे झाड कधीही वाढत नसते.म्हणून आपल्या हक्काचं व्यासपीठ उभे केले. तत्कालीन मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख साहेबांनी मदत केली.दैनिक वृत्तपत्र सम्राट, महाराष्ट्रभर गाजला. नुसता गाजला नाही तर, मानव मुक्तीचे मानवमुक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.त्याच ताकदीने बबनरावांनीही प्रसिद्धी दिली.तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री ना. हंडोरे साहेबांनी जिल्ह्या जिल्हात उभ्या केलेल्या,रमाई आवास योजना असो,,महात्मा फुले आर्थिक विकास योजना असो, उच्च शिक्षण शिष्यवृत्ती असो,प्रसिध्दी दिली.कोणी काही म्हणो, “बबनरावांनी” झंझावात उभा केला.पुढील “शासन सम्राट ” आक्रीत या क्षणी उचीत नाही.आमची भेट संजय दादा गायकवाड नगरसेवक कुळगाव बदलापूर नगरपरिषद, यांच्या मातोश्री विठाबाई अ. गायकवाड वजलदान विधीच्या निमित्ताने झाली होती. तसे दादर कार्यालयात दोन वेळा भेटलो होतो. त्यावेळी आमचा “जागल्या ” कवितासंग्रह “कांबळे” साहेबांना भेट दिला होता. आम्ही खैरलांजी असो, नगर पाथर्डी, औरंगाबाद, मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्न असो,यवतमाळ जिल्ह्यातील, अन्यायाला बहुजनांच्या प्रश्नाला वाचा फोडली. दिवंगत बबन कांबळे यांना लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली आदरांजली.!