नवी मुबंई व पालघर येथे कुणबी समाज भवन उभारण्यासाठी भूखंड द्या. आमदार किसन कथोरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी,

ठाणे!ठाणे व पालघर जिल्ह्यात मोठ्या संख्येने कुणबी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. शेतीवर गुजरान करत जीवनशैली जगत असणारा हा समाज आज ही विकासापासून वंचित आहे. या दोन्ही जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील कुणबी समाजबांधवाना आपले शैक्षणिक, संस्कृतिक व सामाजिक उपक्रम, सोहळे पार पाडण्यासाठी स्वतःच भव्य स्वरूपाची भवन दोन्ही जिल्ह्यात नाही. त्यामुळे कुणबी समाज बांधवांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर व्हावी व नवी मुंबई येथे सिडको कडून स्वतंत्र पाच एकर चा व पालघर येथे पाच एकरचा भूखंड कुणबी समाजाला त्वरित द्यावा अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी आज दिनांक 7फेब्रुवारी रोजी सहाद्री आतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार किसन कथोरे यांनी निवेदन दिले त्यावेळी आमदार संजय कुटे त्यांच्या सोबत होते, यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सदर दोन्ही भूखंड देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे,
ठाणे त व पालघर जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासाला यामुळे चालना मिळणार आहे, तसेच या समाजातील गरीब गरजू विध्यार्थ्याना सुविधा उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे . तसेच आगरी व कोळी समाज बांधवाप्रमाणे कुणबी समाजाचं भवन उभारले जाणार आहे.