सन्मानपूर्वक चर्चा झाल्याशिवाय युती/आघाडी नाही-अण्णासाहेब कटारे (राष्ट्रीय अध्यक्ष) राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष

नाशिक(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
दिनांक 11 व 12 फेब्रुवारी 2023 या दोन्ही दिवस बैठक सुरू होती पक्षाच्या वाटचाली बाबत आढावा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत देखील पक्षाची भूमिका काय असावी याबाबत अनेक मान्यवरांनी आपली भूमिका विषद केली.
अण्णासाहेब कटारे यांनी बैठकीस मार्गदर्शन करतांना सांगितले की सध्या महाराष्ट्रात सर्वच पक्षांमध्ये युती/आघाडी बाबत स्पर्धा लागलेली आहे आप-आपल्या पक्षांची विचारधारा-विचारसरणी बाजूला सारून तडजोडी होत आहे.
परंतु
*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मात्र आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहुनच व पक्षातील नेते/पदाधिकारी कार्यकर्त्यांचे व जनतेचे हित बघूनच जो पक्ष राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला योग्य तो सन्मान करण्याची ग्वाही देईल त्याच पक्षासोबत भविष्यात युती आघाडी चा निर्णय होऊ शकतो असेही कटारे यांनी सांगितले
कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांना कोणत्या पक्षा बरोबर युती- आघाडी करावी अथवा करू नये याबाबतचे सर्व अधिकार देखील कोअर कमिटीच्या बैठकीत ठरावा द्वारे अण्णासाहेब कटारे यांना देण्यात आले.
लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील समस्त नेते/ विभागीय अध्यक्ष/ जिल्हा अध्यक्ष/ शहराध्यक्ष /महानगर प्रमुख /तालुकाप्रमुख व ज्येष्ठ नेते यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचेही शेवटी अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले.
*बैठकीस कोअर कमिटी सदस्य शेषराव जी गणवीर,संतोष जी मोकळे,वसंतराव वाघमारे,सचिन जी नांगरे,दिलीप जी प्रधान,बिपीन जी कटारे,अँड.विजयजी पवार,शांताराम बापू थोरे,अशोक जी शेलार, हेमराजजी टेंभुर्णे,विश्वास जी कांबळे,कांतीलालजी सोनवणे,संदीप जी बनसोडे,प्रसाद जी फाफाळे,राजाराम जी बनसोडे,प्रशांत जी कटारे*
उपस्थित होते.