केळशी मधिल शिक्षिका दिप्ती दत्तात्रय माळवदे आदर्श शिक्षिक पुरस्काराने सन्मानित
दापोली प्रतिनिधी

दि १९ फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती निमित पंचायत समिती दापोली यांच्या वतीने 2022- 23 या सालचा पंचायत समिती आदर्श शिक्षिका पुरस्कार दिप्ती दत्तात्रय माळवदे यांना दापोली- मंडणगड तालुक्याचे आमदार योगेश कदम यांचे शुभहस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला रायगड – रत्नागिरीचे खासदार सुनिल तटकरे तसेच गटविकास अधिकारी एम. आर. दिघे,गट शिक्षण आधिकारी आण्णासाहेब बळवंतराव , भगवानराव घाडगे, जीवन सुर्ले, गणेश तांबोटकर, सुनील खरात सहा.गटविकास अधिकारी , डॉ. किशोर जाधव तालुका आरोग्य अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी दिघे होते. या कार्यक्रमाचे आयोजन दापोली येथील रसिकरंजन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
सदरचा पुरस्कार हा दापोली व्हिजन 4 व इयत्ता ५ वी. शिष्यवृत्ती परीक्षांसाठी उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात आला आहे.
दिप्ती माळवदे यांना या अगोदर सातारा जिल्हयातील पाटण पंचायत समिती च्या वतीने दोन वेळा आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच 2019 मध्येही पंचायत समिती दापोली यांच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे.
दिप्ती माळवदे यांना 2022 – 23 आदर्श शिक्षिका पुरस्कारामुळे केळशी परीसरातून सर्वत्र कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.