ताज्या घडामोडी

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे लोकशाही की पेशवाई , जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न..

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन सादर....

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सलग्न कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने मा कृष्णा इंगळे साहेब अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांच्या आदेशानुसार लोकशाही की पेशवाई हे धरणे आंदोलन दिनांक 24.02.23 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व पदोन्नती आरक्षण मिळालेच पाहिजे,सरळसेवा भरती अनुशेष भरून काढा,एकच मिशन जुनी पेन्शन,मुख्यालयी रहाण्याची अट रद्द करा यासारख्या घोषणा देऊन घेण्यात आले


महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय दिनांक 7 मे 2021 अन्वये महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित ठेवले आहे शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 29 डिसेंबर 2017 अन्वये एक साधे पत्र काढून, मागासवर्गीयांच्या पदोन्नती रोखल्या होत्या व दिनांक 7 मे 2021चे निर्णयानुसार मागासवर्गी यांच्या पदोन्नतीस अडथळा निर्माण केला आहे


भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अनु जाती,जमाती, सह इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना देखील पदोन्नती सरळ सेवा भरती मध्ये दिलेल्या सवलतीस अनुसरून अनेक निर्णय व मार्गदर्शन करून मागासवर्गीय पदोन्नती ही बाब राज्य सरकारवर सोपवली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची व मार्गदर्शनाची केंद्र शासनाने अंमलबजावणी करून देशाच्या सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या माननीय मुख्य सचिव यांना 15 जून 2018 परी पत्रकाद्वारे कळवले की, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या रोखता येणार नाही असे स्पष्ट निर्देश देऊनही महाराष्ट्र शासनाने अद्यापही मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय कर्मचारी त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहिले आहेत, त्यामुळे शासनाप्रती त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे तसेच 2005 नंतरच्या सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, तसेच पदोन्नती प्रमाणेच सरळसेवा भरतीमधे देखील मागासवर्गियांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत सदरची पदे ही प्राधान्याने भरण्यात यावीत या व अशा इतर मागण्यांचे निवेदन ठाणे जिल्ह्याच्या वतीने मा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून मा मुख्यमंत्री यांना देण्यात आले


तसेच ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ठाणे पालघर जिल्हा विकल्पविपरीत समायोजन,निधी प्राप्त होऊनही होत असलेली वेतन दिरंगाई,चटोपाध्याय प्रस्ताव मंजुरी ,प्रलंबित बिले,सुगम दुर्गम यादी नव्याने जाहीर करणे यासरख्या प्रलंबित समस्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी मा मनुज जिंदाल साहेब यांच्याकडे देण्यात आले.
प्रमुख मागण्या
1)पदोन्नती मधील मागासवर्गीय आरक्षण तत्काळ इतर राज्यांप्रमाणे लागू करून लाभ देण्यात यावा
2)2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यात ही जुनी पेन्शन योजना लागू करावी
3) सरळ सेवा भरती मधील मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या पदांचा जवळपास तीन लाख 40 हजार एव्हढा व पदोन्नतीमधील 1,15,000 इतका अनुशेष व पदे रिक्त आहेत तरी सदरची पदे त्वरित भरणेत यावीत
4) वाहन चालक, परिचर व इतर विविध पदे कंत्राटी पद्धतीने न भरता सरळ सेवा बिंदू नामावली प्रमाणे भरण्यात यावी
5)प्राथमिक शिक्षकांना घरभाडे भत्ता प्राप्त होण्यासाठी मुख्यालयी रहाण्याची अट रद्द करण्यात यावी
6)20 पटापेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करू नयेत
7)केंद्रप्रमुख यांची सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी
8)10.20.30 वर्षाची आश्र्वासित प्रगती योजना प्राथमिक शिक्षकांना मंजूर करावी
9)जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे अनियमित वेतन समस्या दूर करण्यासाठी व सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती उपदाने तसेच शिक्षकांची सर्वच देयके मंजूर करण्यासाठी पर्याप्त निधी उपलब्ध करून देण्याबाबत
10) जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच त्रुटी दूर करून राबवण्यात यावी तसेच 2023/24 बदली प्रक्रिया मार्च 2023 पासून सुरू करण्यात यावी
11)महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांचे मासिक वेतन शंभर टक्के शासन निधीतून होणे बाबत
12) उच्च शिक्षित (MA Med ;Net Set,PhD) धारक शिक्षकांना पदोन्नती मधे संधी देण्याबाबत


यावेळी विजयकुमार जाधव राज्य उपाध्यक्ष ,संतोष गाढे,कोकण अध्यक्ष अशोक गायकवाड,कोकण उपाध्यक्ष,दिनेश शिंदे कोकण कार्याध्यक्ष,प्रवीण कांबळे जिल्हा सचिव , जया पराडकर ठाणे अध्यक्ष दिव्याग विभाग ,मनोज गोंधळी शहापूर अध्यक्ष , व्यंकटेश कांबळे नवी मुंबई अध्यक्ष ,संजय ओंकारेश्वर कल्याण मनपा अध्यक्ष,प्रदीप जोगी भिवंडी मनपा अध्यक्ष प्रभा सरदार अंबरनाथ अध्यक्ष ,राजेंद्र सातपुते भिवंडी प्रभारी अध्यक्ष, लक्ष्मण कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष , सुनील तायडे उपाध्यक्ष ठाणे, अनिल गायकवाड ठाणे उपाध्यक्ष ,संजय धनगर केंद्रप्रमुख मुरबाड प्रतिनिधी,जगदीश गायकवाड शहापूर सचिव ,भाऊराया चौधर शहापूर उपाध्यक्ष ,रतन रामटेके कार्याध्यक्ष शहापूर,दत्तू पालवे उपाध्यक्ष शहापूर ,अनिल वाढविंदे संघटक शहापूर संजय घुले उपाध्यक्ष शहापूर ,महिला आघाडीच्या ऋतुजा गायकवाड,सीमा गायकवाड, वैशाली बागुल ,मनीषा पगारे, रजिया शेख ,धनश्री मेश्री ,नीता मोरे ,सविता म्हात्रे,उपस्थित होत्या , महेश राजपूत,आशिष परदेशी ,राजू पाटील, प्रभाकर गढरी,योगेश पाटील,राकेश गागुर्ड ,दिलीप चव्हाण,विजय कारंडे,शिवाजी सूर्यवंशी ,देविदास सोनवणे, अतिकुर रेहमान ,अन्सारी तारीक,वसीम मिर्जा बेग ,सागर धामोडे आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी होते तर शिक्षक सेना ठाणे मनपा अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी , शिक्षक नेते शरद बागुल व सुरेश जाधव यांनीही आंदोलनात सहभाग दर्शवून पाठिंबा दिला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.