बदलापूर !! उड्डाणपूलावर झालेल्या वाहनांच्या अपघातात तिन जण जखमी तर एकाचा जागीच मृत्यू
ईनोव्हा कार चालक सौरभ कराळे याला पोलिसांनी केली अटक

बदलापूर !! कुळगाव बदलापुर पश्चिम आणि पूर्व परिसराला जोडणाऱ्या उड्डाणपूलावर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक ईनोव्हा कार आणि दोन मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात एका ४७ वर्षिय ईसमाचा जागीच मृत्यू झाला झाला असुन तिन जन गंभीर जखमी झाले असल्याची हृदयद्रावक घटना घडली,मनोज ऊचलानी असे मृत्यू झालेल्या ईसमाचे नाव असून तनुजा थोरात व ईतर दोन जन देखील जखमी झाले आहेत,
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार बेलवली कडून नगरपरिषदेकडे भरधाव वेगाने येत असलेली ईनोव्हा
कार ही वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर ईनोव्हा गाडीने एका मागून एक अशा दोन दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली, जोरदार धडक बसल्याने एका मोटारसायकलचे तुकडे तुकडे झाले असून दुचाकी स्वार मनोज ऊचलानी याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरून जात असलेल्या तनुजा थोरात गंभीर जखमी झाल्या असून रस्त्यावरून जात असलेले दोन पादचारी कीरकोळ जखमी झाले आहेत, जखमींना बदलापुर पुर्व परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, या बाबत बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालक सौरभ कराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास बदलापुर पुर्व पोलिस करत आहेत