ताज्या घडामोडी

बदलापूर मध्ये बेकायदेशीर आठवडे बाजारां विरोधात व्यापारऱ्यांचा एल्गार,,, बहुजन मुक्ती पार्टीचा पालिका कार्यालयावर धडक मोर्चा

कुळगाव बदलापुर नगरपालिका हद्दीतील बेकायदेशीर आठवडे बाजार बंद करण्याची मागणी करत बदलापुर शहरातील भाजी विक्रेते आणि ईतर व्यापारी संघटनेच्या वतीने आज दिनांक १८ मार्च २०२३ रोजी बदलापुर नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला, बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सदरच्या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, बदलापुर नगरपालिका हद्दीत शासनाची कोणतीही परवानगी नसताना स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या अधिपत्याखाली दररोज ठिक ठिकाणी बेकायदेशीर आठवडे बाजार भरवले जात असल्याने अधिकृत भाजी विक्रेते आणि ईतर व्यापारी यांच्यावर ऊपसमारीची वेळ आली असल्याचा आरोप भाजी विक्रेते यांनी केला आहे,

हे आठवडे बाजार हे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी भरतवर असल्याचे भाजी विक्रेते संघाचे अध्यक्ष सुरेश जवळेकर यांनी म्हटले आहे, गेल्या तिस वर्षा पासून आनंद दिघे भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट मधिल भाजी विक्रेते यांच्यावर सातत्याने अन्याय केला जात असुन, गेले अनेक वर्षे स्वतंत्र भाजी मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी भाजी विक्रेते सातत्याने संघर्ष करत आहेत,

परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी या बाबत कोणतही सहकार्य करत नसुन ऊलट पालिका प्रशासनाला हाताशी धरून शहरात ठिकठिकाणी आठवडे बाजार भरुवुन स्थानिक भाजी विक्रेते यांना उपासमारीची वेळ आणली जात आहे, बहुजन मुक्ती पार्टीने या बाबत गंभीर दखल घेतली असून या व्यापाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा उभारला असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश येलवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,याच अनुषंगाने आज व्यापारी संघटनां बरोबर बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकारी यांनी थेट नगरपालिका कार्यालयावर धडक देवुन, पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला,

या वेळी मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांनी आंदोलकांशी चर्चा करून शहरामध्ये वेळोवेळी सुरू असलेले आठवडे बाजारांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले,आता मुख्याधिकारी सदरचे आठवडे बाजार बंद करण्यासाठी कशा प्रकारे कारवाई करणार आहे हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.