श्री समर्थ बैठकीतील सदस्यांनी मिळालेली ७० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन केली पोलिसांच्या स्वाधीन,,,
प्रतिनिधी अरुण ठाकरे

मुरबाड! श्री समर्थ बैठकीतील शिकवणीचा दाखला देत मुरबाड मधिल कळबाड येथिल कुटुंबाने त्यांना एका हॉटेलमध्ये मिळुन आलेली सोन्याची सुमारे ७० हजार रुपये किंमतीची चैन त्यांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता मुरबाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या स्वाधीन केली आहे,
सरळगाव या ठिकाणी असलेल्या वैभव हॉटेल या ठिकाणी दिनांक १९ मार्च रोजी श्री वसंत आंबो दळवी व त्यांच्या पत्नी वर्षा वसंत दळवी हे या हॉटेल परिसरात आले असता त्यांना याच हॉटेलमध्ये एक सोन्याची पडलेली चैन मिळुन आली, परंतु ही मिळालेली चैन त्या मुळ मालकालाच परत मिळाली पाहिजे अशा उदात्त हेतूने या पती पत्नी यांनी थेट मुरबाड पोलिस ठाणे गाठत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रसाद पांढरे यांची भेट घेऊन सदरची चैन मुळ मालकाला मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली, या वेळी माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या दांपत्यांचा पोलिस ठाण्यात शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला,
या दांपत्याने जमा केलेली सोन्याची चैन ज्याची कोणाची असेल त्यांनी सबळ पुरावा सादर करून आपला ऐवज घेऊन जाण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी केले आहे, दांपत्यानी दाखवलेल्या या माणुसकीच्या दर्शना बाबत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे