जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेत आरोग्य शिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा ता.भिवंडी येथे बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी के.ई एम हाॅस्पीटल, स्कूल ऑफ नर्सिग अंतर्गत *आरोग्य शिक्षण, गोवर आजार व अन्नविषबाधा* या आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
मा.वैशाली चव्हाण मॅडम सि.ट्यूटर के.इ.एम.हाॅस्पीटल स्कूल ऑफ नर्सिंग यांचे मार्गदर्शन अंतर्गत कु.राधिका पाटील प्रथम वर्षीय,जी.एन एम.विद्यार्थींनीने *गोवर आजारावर* मार्गदर्शन केले.गोवर आजार म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? तो होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? इ.विषयी मार्गदर्शन केले.
तसेच कुमारी कोमल पंडीत हीने *अन्न अन्नविषबाधा* या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.अन्नविषबाधा म्हणजे काय?विषबाधा कशी होते? ती होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी तसेच वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी इ.विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी मा. वैशाली चव्हाण यांचे तर दिलशाद शेख मॅडम यांनी कुमारी राधीका पाटील व कुमारी कोमल पंडित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्याध्यापक जगदीश जाधव यांनी आभार मानले.