आरोग्य व शिक्षण

जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेत स्मृतिदिनानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना केले अभिवादन

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा केंद्र कोशिंबी,ता.भिवंडी जि.ठाणे येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11-30 वाजता संपन्न झाला.
*प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार शाळाव्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष अशोक म्हसकर यांचे हस्ते अर्पण करून दीपप्रज्वलन पालक गीता वाघे यांनी केले


.
सर्व विद्यार्थी व शिक्षक ,पालक यांनी महात्मा फुले यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी क्रांतीसूर्य,,थोर समाजसुधारक, थोर लेखक, स्त्री शिक्षणाचे जनक, शिक्षण उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन कार्यावर, शिक्षण व सामाजिक कार्याबद्दल प्रबोधनपर मार्गदर्शन करून वैचारिक अभिवादन केले*


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड सर यांनी केले तर आभार दिलशाद शेख मॅडम यांनी मानले.

सदर अभिवादन कार्यक्रम प्रसंगी शाळाव्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष अशोक म्हसकर, मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख, ग्रामस्थ, पालक गीता वाघे,ललिता माझी,रविता वाघे,बेबी मुकणे,जनाबाई अन्सारी व विद्यार्थी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.