ठाणे लोकमान्य नगर मध्ये सख्य महिला मार्गदर्शन केंद्र आयोजित जागतिक महिला दिन सोहळा संपन्न,

ठाणे येथील लोकमान्य नगर मधील गणेश नगर येथील अंगणवाडीमध्ये सख्य महिला मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने महिला दिन साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक पुनम चव्हाण प्रमुख पाहुणे लाभले. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणार्या सुविधा निर्भया पथक, भरोसा सेल व संविधानाने दिलेले महिलांच्या विशेष कायद्यांविषयी माहिती पोलीस उपनिरीक्षक पुनम चव्हाण यांनी
दिली. महिला दिन कार्यक्रमाचा औचित साधून सदर कार्यक्रमात महिला सुरक्षा व महिलांच्या अधिकारांविषयी जनजागृतीपर कार्यक्रम व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘सख्य’ महिला मार्गदर्शन केंद्र’ सन १९८७ पासून “लिंगभेदावर आधारित महिलांवर होणारी हिंसा” व यासारख्या समस्यागस्त महिलांसाठी पालघर जिल्हा तसेच ठाणे विभागात कार्य करीत आहे.सख्यच्या कार्याचे स्वरूप समुपदेशन, वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करणे, संबंधित विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, वस्ती पातळीवर महिला व युवक-युवतींचे गट स्थापन करून त्यांना प्रशिक्षित करणे व घरगुती हिंसाचार विषयी समाजामध्ये जनजागृती व मोहीम चालविणे,असे अनेक सामाजिक उपक्रम सख्य महिला मार्गदर्शन केंद्र राबवत आहे, असे सख्य महिला मार्गदर्शन केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या विजयता पाटील, नीता पवार,पार्वती साबळे यांनी कार्यक्रमानिमित्त बोलत असताना मार्गदर्शन केले.