बदलापूर !! बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी सुप्रसिद्ध विकासक विश्वनाथ पनवेलकर यांना विविध प्रकरणात करोडो रुपयांचा दंड,,,

बदलापूर !! ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध उद्योजक श्री विश्वनाथ पनवेलकर यांना बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी विविध प्रकरणात करोडो रुपयांच्या दंड आकारण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे, सामाजिक कार्यकर्ते महेश बनोटे यांनी माहिती अधिकार कायदा अंतर्गत सदरची माहिती उपलब्ध करून प्रसिद्धी माध्यमांना कळवली आहे,
विश्वनाथ पनवेलकर हे लक्ष्मीनारायण स्टोन क्रशर या नावाने कंपनी चालवीत असुन अंबरनाथ तालुक्यातील अनेक ठिकाणी पनवेलकर यांचे उत्खननाचे काम सुरू आहे, विश्वनाथ पनवेलकर यांनी अंबरनाथ तालुक्यातील माणकीवली,येथील सर्वे नंबर ७६/१ क्षेत्र ४-००-०हे आर मध्ये असलेल्या खदानी मध्ये मंडल अधिकारी गोरेगाव यांनी दिनांक ०३/१/२०२३ रोजी भेट देऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी बेकायदेशीर गौण खनिज साठा आढळून आला असल्याने मा, तहसीलदार यांनी विश्वनाथ पनवेलकर यांना चार कोटी पंचेचाळीस लाख बत्तीस हजार आठशे रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती श्री महेश बनोटे यांनी दिली आहे,
अशाच प्रकारे कुळगाव बदलापुर नगरपालिका हद्दीतील वालिवली येथील स,न,१९१/३क्षेत्र १-९२-४ हे आर व पोट खराबा ०’५१•८० हे आर मध्ये असलेल्या खदानी मध्ये मंडल अधिकारी कुळगाव यांनी दिनांक ०३/०१/ २०२३ रोजी भेट देऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी असलेले गौण खनिज अधिकृत असल्या बाबत कोणतेही पुरावे आढळुन आले नसल्याने मा तहसीलदार यांनी सदर प्रकरणात श्री विश्वनाथ पनवेलकर यांना तिन कोटी एकोणऐंशी लाख एक्कात्तर हजार सहाशे रुपये दंड ठोठावला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,
त्याच प्रमाणे याच दिवशी म्हणजे ०३/०१/२०२३ रोजी अंबरनाथ तालुक्यातील मौजे येवे येथील स, न,८७/२ क्षेत्र ४-९०-००हे आर मध्ये असलेल्या खदानी मंडल अधिकारी गोरेगाव यांनी भेट दिली असता या ठिकाणी देखील असलेले गौण खनिज अधिकृत असल्या बाबत कोणतेही पुरावे आढळुन आले नसल्याने मा, तहसीलदार यांनी या प्रकरणात देखील श्री विश्वनाथ पनवेलकर यांना त्र्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार तिनशे विस रुपये दंड आकारण्यात आला आहे,
या बाबत सामाजिक कार्यकर्ते महेश बनोटे यांनी सदर प्रकरणात मंडल अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार खदान तपासणी ही ई,टी,एस, मशिन व्दारे केल्यास या प्रकरणातील श्री दिपक नारायण बजाज व श्री विश्वनाथ पनवेलकर यांना अधिक मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागणार असुन सदर सर्व खदानींची मोजनी ई,टी, एस, मशिन व्दारे करण्याची मागणी मा तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे केली असून अशा प्रकारे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवत असल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी देखील श्री महेश बनोटे यांनी तहसीलदार अंबरनाथ यांच्याकडे केली आहे, या बाबत तातडीने कारवाई न झाल्यास तहसीलदार कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशाराही श्री महेश बनोटे यांनी दिला आहे, या सर्व प्रकरणात मा, तहसीलदार यांच्या कडे या बाबत सुनावनी सुरू असल्याचे अधिकृत सुत्रांकडून समजते