रिपब्लिकन सेनेच्या मुंबई येथील आनंदपर्व कार्यक्रमास ठाणे जिल्ह्यातील शेकडो भिमसैनिक उपस्थित राहणार.विक्रम भाई खरे (ठाणे जिल्हा निरीक्षक)

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी,इंदू मिलचे प्रणेते आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त,दि.२/६/२०२३ रोजी सायंकाळी ६वाजता रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थी विंग चे मुंबई अध्यक्ष, विद्यार्थी नेते आशिष गाडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या नियोजन समितीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.सामाजिक समतेचे,न्यायाचे ‘ आनंदपर्व ‘ ही टॅग लाईन घेऊन ‘यशवंतराव चव्हाण सेंटर, जगन्नाथ भोसले मार्ग,नरिमन पॉइंट , मंत्रालय समोर मुंबई नं २९ येथे आयोजित केला आहे.
या ‘आनंदपर्व ‘कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत.
तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड.संघराज रुपवते, राष्ट्रीय सरचिटणीस संजीव जी बोधनकर यांची उपस्थिती राहणार आहे.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर जी डबरासे , प्रदेश अपाध्यक्ष विजयदादा वाकोडे, प्रदेश सरचिटणीस युवराज धसवाडीकर, प्रदेश सचिव श्रीपती ढोले सर, प्रदेश संघटक भैय्यासाहेब भालेराव, रिपब्लिकन सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष किरण भाऊ घोंगडे,रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष युवराज बनसोडे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विवेक बनसोडे या कार्यक्रमाला उपस्थित राहुन ” आनंदपर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणार्या जनसमुदायाला मार्गदर्शन करणार आहेत.ठाणे जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेच्या विविध आघाड्याच्या शेकडो भिमसैनिकानी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या आनंदपर्व कार्यक्रमाला उपस्थित वेळेवर उपस्थित रहावे.असे आव्हान रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निरीक्षक विक्रम भाई खरे यांनी केले.