ऊल्हासनगर म्हारळ गावातील खदानीतील पाण्यात बुडुन एका युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ

ऊल्हासनगर म्हारळ गावातील खदानी मध्ये बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे,ऊमेश अंबादास सोनावणे असे मृत तरुणाचे नाव असून तो म्हारळ गावातील क्रांतीनंतर परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे,
दिनांक १४ जुलै रोजी ऊमेश हा आपल्या काही मित्रांबरोबर म्हारळ हद्दीतील खदानी जवळ असलेल्या एका धाब्यावर गेले असताना,खदानी मध्ये साचलेल्या पाण्यात आपला शर्ट धुण्यासाठी गेला होता, शर्ट धुत असताना त्याला याच पाण्यात डुबकी मारण्याचा मोह झाला, आणि तो खदानीतील पाण्या मध्ये ऊतरला परंतु खदानीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज ऊमेशला आला नाही त्यातच त्याला पोहायला देखील येत नव्हते त्यामुळे तो पाण्यात गटांगळ्या खात असताना त्याच्या बरोबर असलेल्या मित्रांना दिसला पण बरोबरीच्या मित्रांना देखील पोहता येत नसल्याने त्यांनी उमेशला वाचवण्यासाठी दोरी ऊमेशकडे फेकली पण तो पर्यंत बराच उशीर झाला होता,
कारण ऊमेश परत पाण्याच्या वरती आलाच नाही,सदरची घटना ही ऊल्हासनगर येथील अग्निशमन दलाला कळवली असताना, बऱ्याच वेळाने अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आले परंतु ऊमेशचा शोध लागला नाही त्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कल्याण आधारवाडी अग्निशमन दलाची स्पिड बोट या ठिकाणी पाचारण करण्यात आली, आणि स्पिड बोटच्या सहाय्याने अखेर ऊमेशचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला, ऊमेश हा आई वडिलांना एकटाच असुन त्याला दोन बहिणी असल्याचे सुत्रांनी सांगितले असुन ऊमेश यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,
या वेळी खदान परिसरात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सुचना फलक लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे,