जी पी पारसीक सहकारी बॅंकेचा अकरावा वर्धापनदिन संपन्न.!
( तात्यासाहेब सोनवणे यांजकडून १७ जुलै २०२३)

ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मल्टी शेड्युल्ड बॅंकेच्या बदलापूर शाखेचा अकरावा वर्धापनदिन आज सकाळी उद्योजक मनोहर शेठ म्हसकर यांच्या हस्ते संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष गोपीनाथ पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बॅक मॅनेंजर उच्चशिक्षित श्रीमान शिवाजी सुर्यराव, सा. साक्षीचे उपसंपादक समाजमित्र तात्यासाहेब सोनवणे,यांच्यासह दीपप्रज्वलन केले. यावेळी उद्योजक श्री.विकासशेठ गुप्ते, श्री.हरिश,सौ.दक्षा,आदी उपस्थित होते.यावेळी आम्ही मॅनेंजर श्री. सुर्यराव यांना बोलते केले असता बॅकअप सांगितला. कळवा येथे इस. सन. १९७२ ला सहकारमहर्षी गोपीनाथ शिवराम पाटील यांनी, गोरगरिब, कामगार, उद्योगक,व्यापारी यांना केंद्रबिंदू मानून आपल्या श्रमाची पुंजी सुरक्षित रहावी म्हणून जी पी पारसीक सहकारी बँकेचे रोपटे लावले. संचालक मंडळही सहकार्य करणारे निर्माण केले
.आज अध्यक्ष श्री. गावंड, उपाध्यक्ष श्री. प्रकाश नकुल पाटील, संचालक श्री.विक्रम गोपीनाथ पाटील,श्री.रणजित गोपीनाथ पाटील,श्री.कय्युम चेऊलकर, श्री. पोपेरे, अदिवासी, ओबीसी,सर्वांनां सोबत घेऊन सहकाराचा मंत्र जपला.आज महाराष्ट्राबरोबर, गोवा म्हापसा,मडगाव, कर्नाटक, बेळगाव,निपाणी,राज्यातही ९१ शाखा निर्माण केल्या. आज मल्टी स्टेट शेड्युल्ड बॅंकेच्या सुरक्षित ठेवी ४२८५ कोटीच्या असून, २०२० कोटी कर्ज वाटप केले आहे. निःस्वार्थपणे ग्राहकांना सेवा उपलब्ध केल्यामुळे आॅडीट “अ” वर्ग नामांकन मिळाले आहे. आज सहकार क्षेत्रात काही उलटसुलट बातम्या येत असताना, आमच्या बॅकेंचा झीरो पर्सेंट 0℅ एनपीए आहे. मुदतठेवी वरील व्याजदर, ७℅ असून जेष्ठ नागरिकांसाठी ७ टक्के असून, जेष्ठ नागरिकांसाठी ७,२५ टक्के,सोने ८.५० ℅ तारण आहे. गृहकर्जावरील व वाहन कर्ज व्याजदर, ८℅ आहे. साधी वार्षिक दिनदर्शिका(कॅलेंडर) छापायची असेल तर, पहिल्या निविदा मागविण्यात येतात. एवढी पारदर्शकता जपली जाते. या कामी डॉ. मधुसुदन दास पै यांच्या आर्थिक शिस्तीमुळे जी पी पारसीक सहकारी बँक ग्राहकांच्या विश्वापात्र पसंतीस उतरली आहे.आसे आवर्जून श्री सुर्यराव यांनी सांगितले..