ताज्या घडामोडी

बदलापूर नगरपालिकेच्या बी,एस,यु,पी योजनेतील घराचा स्लॅब कोसळला,,, जिवीतहानी होता होता टळली

बदलापूर! कुळगाव बदलापुर नगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधून दिलेल्या एका इमारतीतील घराचा स्लॅब अचानक कोसळुन, सुदैवाने जीवितहानी होता होता टळली आहे, बदलापुर पुर्व परिसरातील म्हाडा वसाहतीमधिल बिल्डिंग क्रमांक १२ या इमारती मधिल चौथ्या माळ्यावर राहत असलेले वाघ कुंटुब दिनांक २५ जुलै २०२३ रोजी रात्री दहाच्या सुमारास काही कारणास्तव इमारतीच्या खाली आले होते, आणि नेमकी त्याचवेळी त्यांचा घरातील स्लॅब अचानक कोसळला, सुदैवाने हा परिवार इमारतीच्या खाली आला असल्याने ते थोडक्यात बचावले असल्याची माहिती समोर आली आहे,बी एस यु पी योजनेतील लाभार्थ्यांना सुमारे दहा वर्षापूर्वी ही घर देण्याच्या निर्णय घेतला गेला होता, त्या नंतर सन २०१९ मध्ये प्रत्यक्षात लाभार्थी यांना घराचा ताबा देण्यात आला होता, परंतु सदरच्या घटनेने ठेकेदारांनी याच लाभार्थी यांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणायला हरकत नाही, आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी हे देखील किती निष्ळाजी आहेत याची प्रचिती देखील येते,सदरची घटना घडल्या नंतर पालिकेचे मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे आणि पालिकेचे ईतर अधिकारी यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन,सदर घराच्या स्लबची दुरुस्ती करुन दिली असल्याचे समजते, तत्पूर्वी पालिकेचे अधिकारी श्री लोखंडे यांनी सदर कुंटुबाला तातडीने स्थलांतरित होण्याचे पत्र दिले असल्याची माहिती समोर आली आहे, परंतु स्थानिक रहिवासी यांनी सक्तीने घेतल्यानंतर आपले पाप लपविण्यासाठी पालिका प्रशासनाने रोतोरात घराची दुरुस्ती करून दिली असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले,म्हाडा वसाहतीमधिल बी एस यु पी च्या ईमारती मधिल अनेक रहावाशी यांना अद्याप अलॉटमेंट लेटर देखील दिले नसल्याने, ईमारती मधिल रहिवाशांना सोसायटी बनवता येत त्या ईमराती मध्ये कोणतेही काम करण्यास तेथील नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याने, पालिका प्रशासनाच्या विरोधात त्यांनी संताप व्यक्त केला आहे, एकंदरीत बी एस यु पी योजनेतील लाभार्थ्यांना मिळालेली घर ही अतिशय निष्कृष्ट दर्जाचे असुन, भविष्यात अनेक लाभार्थी यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे हे मात्र नक्की,आता पालिका प्रशासन या पुढे कोणती काळजी घेणार आहे हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.