बदलापूर! बगीचा आणि क्रिडांगणासाठी आरक्षित जागा टाटा पॉवर कंपनीला देण्याची राजकीय दलालांची ईच्छा आहे,,,,_प्रदिप रोकडे

कुळगाव बदलापुर नगरपालिका हद्दीतील कात्रप येथील बगीचा आणि क्रिडांगणासाठी आरक्षित असलेली जागा टाटा पॉवर कंपनीला देण्यासाठी आता काही राजकीय दलाल पुढे आले असल्याचे मत कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार प्रदीप गोविंद रोकडे यांनी व्यक्त केले आहे, बदलापुर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महावितरण कंपनींला सरसकट विज पुरवठा करता येत नसल्याने, अतिरिक्त विजपुरवठा मिळणेसाठी टाटा पॉवर कंपनीचा विज प्रकल्प बदलापुर शहरात आणण्याची मागणी होत आहे,त्या साठी कोणाचाही विरोध नाही,आमचा देखील टाटा पॉवर कंपनीला विरोध नसल्याचे प्रदीप रोकडे यांनी म्हटले आहे,
परंतु नगरपालिकेने बगीचा आणि क्रिडांगणासाठी आरक्षित केलेली जागा या प्रकल्पाला देऊ नये अशी आमची मागणी आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रत्येक शहरात अशा प्रकारचे आरक्षण दिले जाते, बगीचा आणि क्रिडांगणाला लागुनच हा विज प्रकल्प झाला तर पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे, त्या मुळे ही आरक्षित जागा टाटा पॉवर कंपनीला देण्यास आमचा आजही ठाम विरोध असुन त्या बाबतचे निवेदन आपण पालिका प्रशासनाला दिले असल्याचे प्रदिप रोकडे यांनी सांगितले आहे,
असे असताना देखील काही राजकीय दलाल आरक्षित जागे मधील काही जागा टाटा पॉवर कंपनीला देण्यासाठी पुढे सरसावले आहेत, नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता टाटा पॉवर कंपनी कडून दलाली मिळण्यासाठी हा सर्व खटाटोप राजकीय दलालांचा सुरू असुन, अशा राजकीय दलालांच्या दबावाला बळी पडून पालिका प्रशासनाने आरक्षित जागा टाटा पॉवर कंपनीला दिल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदीप रोकडे यांनी दिला आहे, बदलापुर शहरामध्ये अनेक खासगी जागा उपलब्ध असुन टाटा पॉवर कंपनीने जागा स्वतः विकत घेऊन हा विज प्रकल्प राबविण्यास आमचा कोणताही विरोध नसून, आरक्षित जागेवर मात्र कोणत्याही परिस्थितीत हा विज प्रकल्प होऊ देणार नसल्याचे प्रदीप रोकडे यांनी म्हटले आहे,