अंबरनाथ शहर काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष पदी आत्माराम (बबन) तांबे यांची नियुक्ती
अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत कारंडे यांच्या हस्ते नियुक्ती

अंबरनाथ बदलापूर शहर अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठकीचे कॉंग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत शामराव कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापुर पुर्व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजन करण्यात आले होते, या वेळी अनेक कार्यकर्त्यांचा पक्षा मध्ये प्रवेश घेण्यात आला, अंबरनाथ शहरातील अनुसूचित जाती विभागाच्या कामाला गती मिळण्यासाठी आत्माराम तांबे यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता, त्यांची अंबरनाथ शहर शहर
अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,
अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत शामराव कारंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन आत्माराम तांबे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, या वेळी अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह पर्यावरण विभाग विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे, ठाणे जिल्हा कॉंग्रेस युवक अध्यक्ष अजगर खान, बदलापुर शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान, अंबरनाथ शहर अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष आत्माराम तांबे,हर्षद भोईर,देवराज अलझेंडे,नईम शेख, संकेत तांबे, अकबर शेख यांचा सह बदलापुर अंबरनाथ मधिल पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,