रिलायन्स इथेन पाईप लाईन लि. तर्फे ढोके दापिवली शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले || तोची साधु ओळखावा || देव तेथेची जाणावा ,-||-जगतगुरु संत तुकोबाराय

*आज दि.०७/०८/२०२३ रोजी रिलायन्स इथेन पाईप लाईन लि. तर्फे ढोके दापिवली शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.*
*या किटमध्ये रजिस्टर वह्या,लेखन साहित्य व विद्यार्थी शालेय उपयोगी वस्तू होत्या.*
*हे शालेय उपयोगी साहित्य आणणारे रिलायन्स इथेन पाईप लाईन लि.चे उच्चपदस्थ आॕफीसर्स सन्माननीय श्री.व्हि. जे.सौंदादे सर, सन्माननीय श्री.शहाजी सर व अन्य रिलायन्स चे उच्च पदस्थ अधिकारी यांनी स्वतः शाळेपर्यंत आणत उपलब्धता केली.*
*या शालेय वस्तू वाटप कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती.
ती म्हणजे गावच्या सरपंच ताई सौ.पूजाताई सचिन गायकर,शा.व्य.स.उपाध्यक्ष श्री.सुनिल गायकर,शा.व्य.स.सदस्या सौ.चंद्राताई भोईर,सौ.अर्चनाताई गायकर,युवा समाज सेवक श्री. सचिन गायकर,मुळगांव केंद्रांचे केंद्रप्रमुख श्री.गणेश जाधव सर, संगीत विशारद श्री.शंकर घोडगे सर, ग्रामसेविका सौ.अरुणा सिंगासने मॅडम,पालक प्रतिनिधी श्री.दत्तात्रय शिसवे,सौ.उर्मिला धुमाळ,शाळेचे मुख्याध्यापक श्री.शंकर झाडबुके सर,प्राथमिक सेवाजेष्ठ शिक्षक श्री.पांडुरंग पाटील सर,पदवीधर शिक्षिका सौ.वृषाली वेदपाठक मॕडम, शाळेचे प्राथमिक शिक्षक श्री. आनंद सोनकांबळे सर इ.ची प्रमुख उपस्थिती होती.*
*सरते शेवटी शालेय उपयोगी साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करणा-या रिलायन्स इथेन पाईप लाईन लि.च्या सर्व सन्माननीय दानदात्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.*