राजकीय
खेडचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या सुकन्या प्रिया पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

चाकण : खेडचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या सुकन्या प्रिया नारायणराव पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
गेल्या अनेक वर्ष आपण युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी कार्यरत आहात. आपल्या सामाजिक व संघटनात्मक अनुभवाचा उपयोग पक्ष कार्यासाठी निश्चितपणे होईल. आपण ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडाल, असा विश्वास राहुल लोणीकर यांनी व्यक्त करून पवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष संघटनेच्या वाढीसाठी कार्य करून विशेषतः युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे प्रिया पवार यांनी सांगितले.