धम्मसृष्टी फाऊंडेशन व जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा तर्फे मोफत आरोग्य व मोफत औषधोपचार शिबिर संपन्न

गृप ग्रामपंचायत कार्यालय डोहोळेपाडा ता.भिवंडी येथे रविवार दिनांक 27/8/2023 रोजी धम्म सृष्टी फाऊंडेशन व जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री प्रगती फाऊंडेशनचे हिरा मोंगी नवनित हाॅस्पीटल यांचे सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिर संपन्न झाले.
शिबिराची सुरूवात छत्रपती शिवाजीमहाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला उपस्थित डाॅक्टर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
उपस्थित सर्व डाॅक्टर व शिबिरार्थी यांचे धम्म सृष्टी फाऊंडेशन वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
*मोफत आरोग्य शिबिरात डोहोळे परिसरातील 100 पेक्षा जास्त विद्यार्थी,महिला,पुरूष, वयोवृद्ध पेशंट्सनी ( शिबिरार्थी) लाभ घेतला. आरोग्य तपासणीअंती सर्वांना मोफत औषधोपचार करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांची आरोग्य तपासणीसाठी महिला तज्ञ डाॅक्टर उपस्थित होत्या*.
या वेळी हिरा मोंगी नवनित हाॅस्पीटल चे सी.ई.ओ.एम डी डाॅ.अनुपम करमाकर, मेडिकल एडमिन डाॅ.अशोक परदेशी,मेडिकल ऑफिसर डाॅ.पुरणिमा धाडी,नर्सिंग मेट्रन अनुप्रिता मुरकर, नर्स सोनाली ओंबाळकर, ऑपरेशन एकिक्यूटिव श्रद्धा जाधव, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता विराज कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.
आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी धम्मसृष्टी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण कांबळे,कास्ट्राईब राज्य कार्यकारणी सदस्य, सहशिक्षक अशोक गायकवाड,मॅनेजर सिरम इन्स्टिटय़ूट विरेंद्र येवले व गृप ग्रामपंचायत डोहोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.