क्राईम

धमकी देणाऱ्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा!,,, सुधागड तालुक्यातील पत्रकारांची मागणी

पत्रकार पठाण यांना जीवे मारण्याची धमकी

रायगड / विशेष प्रतिनिधी :- दैनिक रायगड न्यूजचे मुख्य संपादक तथा पत्रकार गौस खान पठाण यांना आज एकाने धमकी दिल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी पत्रकार गौस खान पठाण पाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता फक्त ‘एनसी’ दाखल करून घेण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथास्तंभ असून अश्या प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, त्यामुळे धमकी देणाऱ्या विरोधात पत्रकार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुधागड तालुक्यातील पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली.

पाली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सरीता चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सुधागड तालुक्यातील आम्ही सर्व पत्रकार निवेदन देतो की आमचे सहकारी गौसखान पठाण यांना पालीतील बस चालक यांनी आज सकाळी शालेय बसमधून फी न भरलेल्या मुलाला उतरवित असताना पत्रकार गौस खान पठाण यांनी विचारणा केली असता, त्यांना यात तुम्ही पडू नका, अशी विनंती ड्रायव्हर यांनी केल्यावर गौस खान पठाण तिथून निघून गेले, परंतु याचा तसेच मागे काही महिन्यांपूर्वी राठोड यांच्या बाबतीतील बातमीचा राग मनात असल्यामुळे राठोड यांनी गौस खान पठाण यांना फोनवरून जिवे मारण्याची तसेच तंगड्या तोडण्याची धमकी दिली व माझ्या विरोधात बातम्या देतो तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. सध्या महाराष्ट्रात पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असून त्यांना बातमी दिल्यानंतर जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, त्यामुळे पत्रकारांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथास्तंभ असून अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, त्यामुळे धमकी देणाऱ्या राठोड विरोधात पत्रकार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी पत्रकार मंगेश यादव, विनोद भोईर, रविंद्रनाथ ओव्हाळ, गौसखान पठाण, एडव्होकेट काशिनाथ ठाकूर, भगवान शिंदे, निशांत पवार, एडव्होकेट सुशील गायकवाड, खलील सुर्वे, फिरोज पिंजारी, प्रशांत हिंगणे, निकेश पोकळे, शरद निकुंभ, निलेश धारीया, राजेंद्र मेहता, संदेश उतेकर आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.