अत्याचार विरोधी कृती समिती ची श्रीरामपुर ॲट्रोसिटी प्रकरणी उपोषण आंदोलनास भेट,,
डी. वाय एस. पी. डॉ,शिवपुजे श्रीराम पुर यांना लेखी निवेदनाद्वारे निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी,

नाशिक प्रतिनिधी!शांताराम दुनबळे नाशिक-:श्रीरामपुर तालुक्यात संतापजनक घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर २८/०८/२०२३ रोजी हरेगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर येथील दलित युवकांना चोरीच्या खोटा आरोप करून, जातीयवादी गावगुंडांनी या दलित मुलांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यांना विवस्त्र करून अमानुष पणे मारहाण केलेली आहे. जातीयवादी सैतानाच्या ॵलादिंनी या दलित तरुणांच्या अंगावर थुंकत, लघवी केली, त्यांना आरोपीच्या पायातील बुट जिभेने चाटायला लावले अश्या अनन्वित अत्याचार करून पिडीतांना छळले होते. याबाबत श्रीरामपुर तालूका पो. स्टे. मध्ये गु. र. नं. ४२९/२०२३ नूसार भा. दं. वि. संहिता कलम १४७, १४८, १४९, ३०७, ३६४, ३४२, ५०४, ५०६ तसेच अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रोसिटी) कलम ३ (१) (d), ३ (१) (r), ३ (१) (s), ३ (२) (va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु काही आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे. या अत्याचाराच्या घटनेचा मास्टर माईंड नाना गलांडे हा पोलिसांच्या वरदहस्ताने अजूनही मोकाट फिरतो आहे. त्याला तात्काळ अटक व्हावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रदिप थोरात हे श्रीरामपुर येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा जवळ आमरण उपोषण आंदोलनास बसलेले आहेत. त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपुस करून या आंदोलनास अत्याचार विरोधी कृती समिती (ASKS) च्या वतीने जाहिर पाठिंबाचे लेखी पत्र उपोषण कर्ते यांना दिले आहे. अत्याचार विरोधी कृती समिती चे मुख्य निमंत्रक ॲड. राहुल विष्णू तुपलोंढे आणि शिष्टमंडळाने श्रीरामपूर चे डीवायएसपी डाॅ शिवपुजे साहेबांची भेट घेतली, घटनेबाबत जाब विचारत धारेवर धरले, सर्वच आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा महाराष्ट्र भर आंदोलनाचा इशाराही लेखी निवेदना द्वारे देण्यात आलेला आहे यावेळी पोलीस प्रशासनाने तातडीने पोलीस पथके आरोपीं च्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केलेली असून, लवकरच मास्टर माईंड नाना गलांडे याला अटक होईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी अत्याचार विरोधी कृती समिती चे मुख्य निमंत्रक ॲड. राहुल विष्णू तुपलोंढे, सागर आण्णा शिरसाठ (आर.पी.आय. जिल्हा सचिव नासिक), शिवाजीराव गायकवाड (जेष्ठ आंबेडकरी नेते), दिलीप आहीरे, गौतम आहिरे, (येवला), ऊत्तम मोहन, ईश्वर खंडीझोड, नितीन मोहन, विशाल बागूल, आकाश मोहन, अंकुश मोहन, (हरेगाव माळेवाडी) आदि भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते