*लोकशाही, लोकशाहीचा चौथा स्तंभ मोठा की किरिट सोमय्या मोठा;?*
प्रदिप गोविंद रोकडे - अध्यक्ष लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य

भाजपाचा नेता किरिट सोमय्या याच्या विकृतीचा पर्दाफाश करत लोकशाही वाहिनेने त्याचा खरा चेहरा जनते समोर आणला, लोकशाही वाहिनेने दाखवलेल्या किरिट सोमय्या याच्या विकृतीच्या व्हिडिओचा तपास सुरू करत असताना मात्र गृह विभागाकडून लोकशाही वृत्त वाहिनीच्या अधिकारावच गदा आणुन गळचेपी धोरण स्वीकारले आहे, या मुळे शिंदे फडणवीस सरकारचा पत्रकारां बाबतचा खरा चेहरा देखील समोर आला आहे, या व्हिडिओ प्रसारणा प्रकरणी प्रसारण मंत्रालयाकडून लोकशाहीच्या संपादकांना नोटीस बजावण्यात आली होती, या नोटीसला कायदेशीर उत्तर देखील देण्यात आले होते,असे असताना किरिट सोमय्या याच्या विकृतीच एक प्रकारे समर्थन करुन लोकशाही वाहिनेचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल केला, गुन्ह्याच्या अनुषंगाने खरा तपास न करता लोकशाही वाहिनीला ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत, सरकारच्या या पत्रकार विरोधी धोरणाचा”लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना” जाहीर निषेध करत आहे,या बाबत पुढील लढाई साठी,”लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना”ही कायमच लोकशाही वृत्तवाहिनी आणि संपादक कमलेश सुतार यांच्या बरोबर नेटाने ऊभी राहणार आहे,