ताज्या घडामोडी

नाईक महाविद्यालयात घरगुती साबण प्रशिक्षण शिबिर संपन्न…

रसायन शास्त्र विभागाचा स्तुत्य उपक्रम

नाशिक शांताराम दुनबळे नाशिक-:क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने स्तुत्य उपक्रम राबवला असून घरगुती साबण प्रशिक्षण शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी हे शिबीर राबविण्यात आले आहे. . उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय सानप यांनी सांगितले की, दैंनदिन उपयोगी प्रात्यक्षिके प्रशिक्षण ही काळाची गरज असून कुशलता – उद्योजकता वाढीस दृष्टीने असे शिबीर उपयोगी ठरू शकतात . विभाग प्रमुख डॉ. विजय नोकुडकर यांनी शिबिराची गुणवत्ता व उपयोग याबद्दल मार्गदर्शन केले. साबणाविषयी माहिती देताना मुलांकडून ते साबण बनवून घेण्यात आले. शिबिराच्या समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दिलीप कुटे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्याने ज्ञानाबरोबर त्यांचा उपयोग व्यवहारात करणे आवश्यक असल्याचे सागतांना विद्यार्थ्याने बनविलेल्या साबणकौशल्याचे कौतुक केले. आर वाय के महाविद्यालयातील प्रा. भाऊसाहेब पाटील यांनी साबणाच्या शोधापासून तर आतापर्यंतचा सर्व प्रवास सांगताना प्रेरणा दायक मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन प्रा. हर्षदा देपले यांनी केले तर आभार डॉ. सचिन शिंदे यांनी केले. प्रस्तावना करतांना प्रा. सरीता देवकर यांनी सदर अभ्यासक्रमाची माहिती देऊन शिबिराच्या समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका बजावली. सदर शिबिरात विद्यार्थ्यानी टमाटे, नारळ, बटाटे, गाजर, संत्री, मोसंबी, हळद, मुलतानी माती, तुळस, तेल , अल्कली, आदि पासुन वेगवेगळ्या प्रकारचे उल्लेखनीय साबण बनवून त्यांचे प्रदर्शन देखिल महाविद्यालयात आयोजीत कऱण्यात आले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्रा . वैशाली राऊत, प्रा. समीन शेख, प्रा. कोमल चांदेल, प्रा. अंजली शिंदे, प्रा. अर्चना झनकर, प्रा. रोशनी पिंजारी, प्रा. ऋतुजा सांगळे, प्रा. कपिल रणधीर, प्रा. सुमय्या सय्यद, प्रयोगशाळा परिचर संजय सानप, ज्ञानेश्वर सांगळे आदिनी परिश्रम घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.