ताज्या घडामोडी

जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान “भारतीय संविधान” *संविधान उद्देशिका वाटप. योगेश येलवेंचा स्तुत्य उपक्रम!

१० फेब्रुवारी, २०२४

म्हसळा : प्रतिनिधी

भारतीय संविधान जगामध्ये सर्व श्रेष्ठ म्हणून गणले जाते. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रीसुत्रीवर आधारित, दोन वर्षे, अकरा महिने, अठरा दिवस राबून सर्व श्रेष्ठ संविधान भारतासारख्या खंडप्राय देशाला अर्पण केले.

संविधानाच्या माध्यमातून गरीब श्रीमंतांना समान हक्क बहाल केले. स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतर देखील विविध धर्म, विविध प्रांत, विविध बोलीभाषा असून देखील एकसंध भारत असणे ही संविधानाची ताकद आहे.

अलीकडे काही फॅसिस्टवादी संघटना भारतीय जनतेचे लक्ष विचलित करून समतेवर आधारित असलेले संविधान हळूहळू नष्ट करू पाहत आहेत. मनुस्मृतीच्या माध्यमातून पुन्हा गुलामगिरी लादण्याचे षडयंत्र चालू आहे.

संविधान हे प्रत्येक भारतीयाचे कवचकुंडल असून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन चा एक भाग आहे.

अशा परिस्थितीत खेडोपाडी वसलेल्या भारतीय जनतेला संविधानाचे महत्त्व कळावे, संविधानाविषयी जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने रायगड जिल्हा, म्हसळा तालुक्यातील, कोकबल गावचे सुपुत्र पत्रकार योगेश येलवे यांनी कोकबल पंचक्रोशीत स्वखर्चाने संविधानाचे वाटप केले.

महत्त्वाचे असे की, योगेश येलवे मुंबई स्थित एका प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरी करीत असून आठवड्यातून एकदा आपल्या गावाला भेट देतात. स्थानिक समस्या जाणून घेतात. त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात.

पंचक्रोशीतील संविधान वाटपानंतर संपूर्ण म्हसळा तालुक्यात वाटप करण्याचे योगेश येलवे यांचे पुढील नियोजन आहे.
या उपक्रमामुळे योगेश येलवे यांचा सर्व स्तरातून गौरव करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.