महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने”‘स्वच्छता ही सेवा”‘ अभियानांतर्गत एसएसटी महाविद्यालयातर्फे श्रमदान,,,

महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधीजींना श्रद्धांजली देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिन,एक साथ,एक घंटा श्रमदान’ – ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानामध्ये एसएसटी महाविद्यालयाने उस्फूर्तपणे सहभाग घेत श्रमदान केले.
यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, ग्रीन क्लब, डी एल एल ई युनिट सोबतच महाविद्यालयातील सर्व विभागाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी श्रमदानात सक्रियपणे आपला सहभाग नोंदवून महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरापासून ते व्हीनस चौक पर्यंत स्वच्छता मोहीम राबविली.
यासोबतच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन,हिल लाईन पोलीस स्टेशन,उल्हासनगर रेल्वे स्टेशन या परिसरातही श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’अंतर्गत ‘स्वच्छता पंधरवाड्या’ निमित्त महाविद्यालयातर्फे उल्हासनगर महानगरपालिकेच्या सोबत विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले.
या निमित्तानेच गणेशोत्सवा दरम्यानही एसएसटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ‘निर्माल्य संकलन’ करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते.तसेच स्वयंसेवकांनी विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये जाऊन तेथे ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले.यासोबतच त्या परिसरातील नागरिकांना ‘स्वच्छ भारत’ अभियाना विषयी जनजागृती निर्माण करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही केले. हॆ उपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी, आय क्यू एसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी,उपप्राचार्य व ठाणे जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे,उपप्राचार्य प्रा.दिपक गवादे यांचे विशेष प्रोत्साहन लाभले. याशिवाय कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश पाटील,प्रा.मयूर माथुर आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी बहुमूल्य योगदान दिले.