कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन,,.
शाळा वाचवा,शिक्षण वाचवा,कंत्राटी भरती बंद करा,समूह शाळेच्या नावाखाली गोरगरीब वंचित समाजातील बालकांच्या वाड्या , तांडे,वस्ती वरील शाळा बंद करण्याचे धोरण बंद करा

आज दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी कास्ट्राईब शिक्षक संघटना अध्यक्ष माननीय कृष्णा इंगळे साहेब यांच्या आदेशानुसार कास्ट्राईब शिक्षक संघटना ठाणे च्या वतीने माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे मा.श्री.सुदाम परदेशी साहेब यांच्यामार्फत शिक्षण क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या 65 हजार शाळा दत्तक देणे,20 पटाच्या. आतील शाळा बंद न करणे ,ऑक्टोंबर 2023 ची डेडलाईन देऊनही तीस हजार शिक्षकांची सरळ सेवा भरती न करणे, विविध एजन्सी मार्फत करण्यात येणारी कंत्राटी भरती प्रक्रिया बंद करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे बिंदू नामावली अद्ययावत करताना खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ प्रवर्गात दाखवण्याची सक्ती करणे,10.20.30 वर्षाची आश्र्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी,मुख्यालयी रहाण्याची अट रद्द करावी या विषयांचे निवेदन देण्यात आले
,सदर प्रश्नांवर शासनाने योग्य तोडगा काढावा अन्यथा कास्ट्राईब शिक्षक संघटना या विरोधात आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन करेल हा इशारा या वेळी देण्यात आला आहे यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार जाधव,राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक गायकवाड,कोकण अध्यक्ष संतोष गाढे,शिक्षक सेना अध्यक्ष रवींद्र तरे,प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धीरज भोईर व मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षक उपस्थित होते.