येवल्यात मुक्ती महोत्सवा निमित्त बौद्धिक मेजवानी,,,,, धर्मांतर घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्सवाचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी! शांताराम दुनबळे

नाशिक-: येवला येथे १३ ऑक्टोबर १९३५ रोजी मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्स समिती मुक्तीभूमी येवलाच्या वतीने १३ व्या मुक्ती महोत्सवाचे आयोजन व्याख्याने,कार्यशाळा,करिअर मार्गदर्शन,मुक्ती काव्य-गीत,शाहिरी जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मुक्ती महोत्सवाचे मुख्य प्रवर्तक शरद शेजवळ,मिलिंद पानपाटील,सुरेश खळे,विकास वाहुळ यांनी दिली आहे.
मुक्ती महोत्सव उदघाटन शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर,
उदघाटक डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,येवलाचे अध्यक्ष प्रकाश वाघ यांच्या हस्ते होणार असून
प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश खळे,विकास वाहुळ,सविताताई धिवर उपस्थित राहणार आहेत.
चार दिवसाचे विविध कार्यक्रम
शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर
वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळा
मार्गदर्शक : सूर्यकांत मोरे (आबा मोरे) कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी राहुल वरकडसर तर
प्रमुख पाहुणे म्हणून एस.एन.वाघ,सुभाष वाघेरे असतील
संयोजन महेश विंचूसर,मिलिंद पानपाटीलसर करतील
वेळ सकाळी : १०:३० ते १:०० वा.ठिकाण : अनु.जाती,नवबौद्ध मुलांची निवासी शाळा,बाभूळगाव-येवला
सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर
जाहीर व्याख्यान विषय करिअरच्या संधी आणि तयारी
व्याख्याते प्रा.शैलेंद्र पंडोरे,प्रा.हरेश बनसोडे
अध्यक्ष स्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, बाभूळगाव-येवलाचे गृहापाल लोखंडे सर असतील.
वेळ सायंकाळी ६:०० वा.
ठिकाण : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह,बाभूळगाव- येवला
दिनांक १२ ऑक्टोबर २०२३
संविधान सभेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,भारतीय संविधान व भारतीय लोक ह्या विषयावर
कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स ग्रंथाचे संपादक प्रा.देविदास घोडेस्वार व
प्रा.महेंद्र गायकवाड (संयोजक संविधान साक्षरता-संवर्धन अभियान) हे गुंफणार आहेत.आदिवासी मुलांच्या वसतिगृह ,बाभूळगाव-येवलाचे गृहपाल प्रा.विक्रांत कुकडे सर अध्यक्षस्थानी असतील.
वेळ : सायंकाळी ६:३० वा.
ठिकाण : आदिवासी मुलांचे वसतिगृह, बाभूळगाव-येवला
दिनांक १३ ऑक्टोबर रोजी
सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर,शैक्षणिक साहित्य व ग्रंथदान संकलन उपक्रम,सामाजिक प्रबोधन गीतानाचा कार्यक्रम मुक्ती पहाट,आंबेडकरी शाहिरी जलसा,मुक्ती काव्य गीत गायन कार्यक्रम
सादरकर्ते लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक नाशिक हे करणार असून मुख्य अतिथी : वाय.डी.लोखंडे,सुनील निकाळे,अमीन शेख,भाऊसाहेब जाधव,सुभाष गांगुर्डे,रमेश गायकवाड,महेंद्र पगारे,रणजित संसारे,दत्तू वाघ,प्रा.जितेश पगारे,नितीन संसारे,दीपक लाटे,विनोद त्रिभुवन हे उपस्थित राहणार आहेत
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य संयोजक
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय लोककवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका,येवला,
मिलिंद पानपाटील सर,हिरामण मेश्राम,सुनील वाघ,राजरत्न वाहुळ,मयूर सोनवणे,मिलिंद गुंजाळसर,विश्वास जाधव,बाबासाहेब गोविंद,विकास वाहूळ,अझर शाह,सिद्धार्थ गुंजाळ,अशोक पगारे,संकेत गुंजाळ,साबूर मोमीन,मयूर सोनवणे,डॉ.भाऊसाहेब केदारे,जयश्री सदाफळ,मनोज गुंजाळ,ललित भांबेरे,सुमित गरुड,समाधान निकाळे,राजू गरुड,पवन दळे,प्रदीप पगारे,गिरीश पाटील,रोहित गायकवाड हे प्रयत्नशील आहेत.