लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने काम करा_मा,आ, राहुल बोंद्रे जिल्हाध्यक्ष (चिखली)
चिखली, दि. १३ एप्रिल २०२४,

लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले परंतु या स्फोटाचा तपास अजून लागलेला नाही. भाजपा सरकारच्या काळात देशातील सैनिक सुरक्षित नाही आणि शेतकरीही सुरक्षित नाहीत, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांना विजयी करा असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष मा.आ राहुलभाउ बोंद्रे यांनी केले
आज शनिवार १३ एप्रिल २०२४ ला काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अनुराधा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय चिखली येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे होते यावेळेस महाविकास आघाडी मित्रपक्ष शिवसेना उ.बा.ठा. चे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी बैठकीस भेट देऊन मानवरांच्या उपस्थितीत प्रचाराच्या नियोजन संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळेस पदाधिकाऱ्यांकडून नियोजन संदर्भात विचारमंथन करून मार्गदर्शन सुचना करण्यात आल्या.
काॅग्रेस पक्षाच्या वतिने बुलडाणा लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रामविजय बुरूंगले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळेस प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड गणेशराव पाटील, विजयजी अंभोरे, अॅड. संजयजी राठोड, प्रदेश सचिव रामविजयजी बुरूंगले, डाॅ. स्वातीताई वाकेकर, अॅड. जयश्रीताई शेळके, हाजी दादु सेठ, तसेच जेष्ठ नेते हाजी रशीदखा जमादार, माजी जि. प. अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, प्रदेश काॅग्रेस सेवादल कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज कायंदे, जिल्हा युवक काॅग्रेस चे अध्यक्ष अनिकेत मापारी, जिल्हा महिला महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष अँड. जावेद कुरेशी, विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर, सहकार विभाग जिल्हाध्यक्ष दिपक देशमाने, प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित विभाग साहेबराव पाटोळे, कामगार विभाग जिल्हाध्यक्ष मो. एजाज भाई, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष अतुल सिरसाठ, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष विजय पाटील शेजोळ, नागरी सेल चे जिल्हाध्यक्ष नितीन राठोड, भटक्या विमुक्त जाती चे जिल्हाध्यक्ष एकनाथ चव्हाण, ब्लाॅक काँग्रेस अध्यक्ष सर्वश्री. समाधान सुपेकर, सुनिल तायडे, नंदुभाऊ शिंदे, अविनाश उमरकर, विजय काटोले, अथरुद्दीन काझी, गजानन काकड, विष्णू झोरे , शेख समद भाई, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.