भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या घातपाताचा कट ?
व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असलेल्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष तसेच भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या घातपाताचा कट व्हिडिओ शूटिंग करत असलेल्या एका कार्यकर्त्याच्या सतर्कते मुळे उघडकीस आला असल्याची माहिती समोर आली आहे, निलेश सांबरे हे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा निवडणूक लढवणार असुन संपूर्ण लोकसभा मतदारसंघात त्यांचा दौरा सुरू आहे,याच अनुषंगाने रमजान ईद च्या निमित्ताने निलेश सांबरे हे भिवंडी येथील विविध मान्यवरांच्या भेटी घेण्यासाठी गेले असताना एक अनोळखी तरुण हातात पिस्तूल घेऊन निलेश सांबरे यांच्या दिशेने जात होता,
हा प्रकार कार्यक्रमाची व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असलेल्या एका कार्यकर्त्याच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने आपल्या सहकाऱ्यांना सुचना देऊन सदर तरुणाला घोळक्यातुन बाजूला खेचले,या मुळे मोठा अनर्थ टळला आहे, निलेश सांबरे यांनी तात्काळ भिवंडी पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे,