बदलापूर! रेल्वे प्रवाशी सहकारी मित्र संस्था दरवर्षी प्रमाणे यंदाही दिनांक २३/१०/२०२३ रोजी रेल्वे स्थानकात साजरे करणार “दसरा संमेलन”_रमेश महाजन (संस्थापक अध्यक्ष)

बदलापूर! कुळगाव बदलापुर शहरातील रेल्वे स्थानकात दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील रेल्वे प्रवाशी सहकारी मित्र संस्थेच्या माध्यमातून दसरा संमेलन साजरे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश महाजन यांनी दिली आहे,
रेल्वे प्रवाशी सहकारी मित्र संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विजया दशमीचे औचित्य साधून सेवेतून निवृत्त झालेल्या रेल्वे प्रवासी, अधिकारी व कर्मचारी तसेच मोटरमन गार्ड, स्टेशन प्रबंधक, रेल्वे सुरक्षा रक्षक, पोलिस सुरक्षा रक्षक,वृत्त वाहिनीचे पत्रकार, प्रिंट मीडिया पत्रकार,व विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, या वेळी देखील अशाच स्वरूपाचा कार्यक्रम होणार असून नेहमी प्रमाणे बदलापुर स्थानकातुन सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांचे पुजन करण्यात येणार आहे,
या साठी जे रेल्वे प्रवासी दिनांक १/१०/२०२२ ते ३०/९/२०२३ या कालावधीमध्ये सेवा निवृत्त झालेले आहेत अशा सेवा निवृत्त रेल्वे प्रवाशांनी दिनांक २२/१०/२०२३ पर्यंत आपली नावे ८१०८१५७०७८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन नोंदवण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश महाजन यांनी केले आहे,