बदलापूर नगरपालिकेत कार्यरत सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकाच्या आत्महत्येने खळबळ,,,
आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही

बदलापूर! सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने कुळगाव बदलापुर नगरपालिकेत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाने कर्तव्यावर असताना आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे, नारायण लाटे असे आत्महत्या केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून तो शहापूर तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते,मयत नारायण लाटे हा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचा नोंदणीकृत सुरक्षा रक्षक असुन तो सुमारे पंधरा वर्षांपासून कुळगाव बदलापुर नगरपालिकेत सुरक्षा रक्षक या पदावर काम करत होता,कुळगाव बदलापुर नगरपालिका हद्दीतील सोनीवली या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या ठिकाणी मयत नारायण लाटे कर्तव्य बजावत असताना,आज दिनांक १९/१०/२०२३ रोजी सकाळी नारायण लाटे हा त्याच्या कामाच्या ठिकाणी तेथील एका लोखंडी सळईला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, मिळालेल्या माहितीनुसार नारायण लाटे यानी रात्री कामावर हजर झाल्यानंतर रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समजते, या बाबत माहिती मिळताच पालिका प्रशासनाचे अधिकारी व स्थानिक पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून नारायण लाटे याचा मृतदेह खाली ऊतरवला आणि त्या नंतर सदरचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,आता मिळालेल्या माहितीनुसार शवविच्छेदन झाल्या नंतर नारायण लाटे याचा मृतदेह पालिका प्रशासनाचे अधिकारी त्याच्या शहापुर तालुक्यातील राहत्या घरी घेऊन गेले आहेत,काहीच दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला असताना नारायण लाटे यांनी अशा प्रकारचे पाऊल उचलले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, नारायण लाटे यांनी आत्महत्या का व कशासाठी केली याची माहिती अद्याप मिळाली नसुन बदलापुर पश्चिम पोलिस या आत्महत्ये मागील कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सा़ंगण्यात आले आहे,घटनेचा पुढील तपास महिला सहाय्यक निरीक्षक मोरे मॅडम व पोलिस हवालदार साळुंखे करत आहेत,