बदलापूर !! किरकोळ कारणावरून एका व्यवसायीकावर प्राणघातक हल्ला,, हल्लेखोर पसार

बदलापूर !! किरकोळ कारणावरून एका व्यवसायीकावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना कुळगाव बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे
, बदलापुर पश्चिम शिरगाव या ठिकाणी राहत असलेले व्यवसायिक. नरेंद्र प्रसाद यांचा लहान भाऊ विरेंद्र सुरेंद्र प्रसाद हा रिक्षा चालक असुन तो बदलापूर पुर्व मानकीवली एम आय डी सी परिसरात भाडे घेऊन गेले असता याच परिसरात राहणारे योगेश मराडे, मंथन मुठे, महेश शेटे आणि त्यांचे आणखी काही साथीदार यांनी विरेंद्र प्रसाद यांची रिक्षा अडवून तु आम्हाला कट मारुन गेला असे म्हणत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली,त्या वेळेस विरेंद्र प्रसाद याने आपले मोठे बंधू नरेंद्र प्रसाद यांना सदर प्रकाराची माहिती फोन करून दिली असताना नरेंद्र प्रसाद आणि त्यांचा मुलगा सौरभ प्रसाद हे घटनेच्या स्थळी गेले असता विरेंद्र प्रसाद यांना मारहाण होत असल्याचे दिसून आले, त्या वेळी नरेंद्र प्रसाद यांनी सदर वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असताना यातील काही जणांनी नरेंद्र प्रसाद व त्यांचा मुलगा सौरभ प्रसाद याच्यावर देखील लोखंडी सळईने हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे,
या मध्ये नरेंद्र प्रसाद हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याजवळ टाके पडले असून त्यांना बदलापुर पुर्व कात्रप परिसरातील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,तर विरेंद्र प्रसाद आणि सौरभ प्रसाद यांना मुकामार मारला असुन मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे समजते, या बाबत बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणिल पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, परंतु आरोपींवर कोणत्या कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत कोणतीही माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली नाही, तर अशा प्रकारे किरकोळ वादातून जिवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी नरेंद्र प्रसाद यांच्या परिवाराकडून करण्यात आली आहे,आता पोलिस प्रशासन या बाबत कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे