मुळगाव केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा नियोजनाची भव्य दिव्य आयोजनातून यशस्वीता व विद्यार्थी मित्रांसाठी बक्षिसांची उपलब्धता.

मुळगाव केंद्राच्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सन्माननीय केंद्रप्रमुख श्री.गणेश जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले.कलामंचावर केंद्रप्रमुख श्री.गणेश जाधव सर,सौ.अनिता पाटील मॅडम,सौ.मंदा धुमाळ मॕडम,श्रीमती छाया हांडे मॅडम,सौ.चारुशिला भामरे मॕडम,सौ.सुवर्णा पाटील मॅडम,सौ.रोहीणी अतकारे मॕडम,सौ.वर्मा मॅडम,श्री.नागेश एनोळगे सर,केंद्रीय मुख्याध्यापक श्री.अर्जुन गाजरे सर, विविध गुणदर्शन स्पर्धा अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर सोळंकी सर, श्री.अजय झांजरे सर,पदवीधर शिक्षक श्री.प्रदिप चौधरी सर, श्री.गणपत विशे सर इ.ची विशेष उपस्थिती होती.
केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेचे सुत्रसंचलन अंबरनाथ तालुक्याचे नवोपक्रमशिल प्राथमिक शिक्षक श्री.आनंद सोनकांबळे सर व तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती छाया हांडे मॅडम यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.
स्पर्धेचे प्रास्ताविक व मार्गदर्शन केंद्रप्रमुख श्री.गणेश जाधव सर यांनी केले.
शुभेच्छापर मार्गदर्शन श्री.अर्जुन गाजरे सर यांनी केले.
सर्वप्रथम स्पर्धा प्रकार लोककला/लोकसंगीत नृत्य अविष्कार प्रकाराने स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.
केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत समूह गायन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,नाट्य स्पर्धा इ.स्पर्धा प्रकारात केंद्रातील सर्व शाळांची विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.विजयी स्पर्धकांना केंद्रप्रमुख व शिक्षक बंधु भगिनींच्या वतीने ट्राॅफी, सर्टिफिकेट तसेच मेडल देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन स्पर्धेत आपली कला निपूणता दाखवून दिली.व बक्षिसांची लयलूट केली.
सरते शेवटी सर्व उपस्थितांचे शतशः आभार मानण्यात आले.