ताज्या घडामोडी

बदलापूर पुर्व पश्चिम पोलिस ठाण्यात मागील दोन दिवसात विविध गुन्हांची नोंद,,,,

बदलापूर पुर्व आणि पश्चिम पोलिस ठाण्यात दिनांक २६/२७ डिसेंबर या दोन दिवसांत विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,
दिनांक २६ डिसेंबर रोजी कुळगाव बदलापुर पुर्व दत्तवाडी परिसरात दत्तवाडी गेटच्या कमानी जवळील मोकळ्या जागेत गावठी दारू बेकायदेशीररित्या विक्री करत असल्या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२६/२०२३ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे चंद्रकांत बबन भोईटे याच्यावर प्रोव्हिबिशन कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,याच दिवशी बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुटपाथवर रस्त्यालगत वेगवेगळ्या हातगाडीवर शेगडी ठेवून शेगडी खाली ज्वालाग्रही गॅस सिलिंडरच्या सहाय्याने शेगड्या पेटवून त्यावर चायनीज पदार्थ सुरक्षित राहण्यासाठी पुरेसा बंदोबस्त केला नसल्याने मानवी जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने मिलिंद अरुण बेळेकर राहणार कल्पसिटी कॉम्प्लेक्स कात्रप याच्यावर गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२७/२०२३ नुसार भादवी कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बदलापुर पुर्व परिसरात श्री अपार्टमेंट २ रा माळा शॉप नंबर १३ च्या बाजूला मोकळ्या जागेत स्टेशन रोड या ठिकाणी पत्त्यांचा जुगार खेळत असताना सचिन भगवान म्हात्रे राहणार मोहनानंदनगर, सुरेश तुकाराम चव्हाण राहणार मांजर्ली,दामु गोमा मुरबे राहणार कर्जत पोशिर,नवनाथ मारोती लोंढे राहणार श्री अपार्टमेंट स्टेशन रोड बदलापुर पुर्व यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२८/२०२३ नुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, बदलापुर पुर्व कात्रप पाडा येथे आपसातील वादातून एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आणि महिलेच्या दिरास मारहाण केल्या प्रकरणी दिनांक २७ डिसेंबर रोजी लक्ष्मण रघुनाथ कोंडिलकर, आदित्य रघुनाथ कोंडिलकर यांचे विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२९/२०२३ नुसार भादवी कलम ३५४,३२३,५०४,५०६,४२७,३४ प्रमाणे बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,तर दिनांक २६/१२/२०२३ रोजी बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वालिवली येथे बेकायदेशीर दारु विक्री प्रकरणी निलेश भरत म्हसकर याचे विरोधात मुंबई दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५( ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावदेवी रोड मरगज चाळी समोर सिध्देश प्रकाश बने, निलेश धामणस्कर,जितेश गायकवाड, गप्पा मारत उभे असताना मागिल गुन्ह्याचा मनात राग धरून आरोपी आदर्श गायकवाड, तन्मय गायकवाड,कुणाल जाधव,व अक्षय सर्व राहणार बौध्दवाडा कुळगाव यांनी सिध्देश व त्याचे सहकारी यांचेवर लोखंडी कोयत्याने सपासप वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी यांचेवर गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२९/२०२३ नुसार भादवी कलम ३०७,३२३,५०४,५०६,५०६(२)३४ सह भा,हा, कायदा कलम ४/२५ प्रमाणे बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.