बदलापूर !! राहटोली ग्रामपंचायत सरपंच सौ साक्षी करंदुले यांना खोटी तक्रार दाखल केल्या प्रकरणी ऊल्हासनगर न्यायालयाकडून ५० हजार रुपये भरपाईचे आदेश,,
चेतन बनकर यांची विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

बदलापूर शहराला लागूनच असलेल्या राहटोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ साक्षी करंदुले यांना एका प्रकरणात खोटी तक्रार दाखल केल्या प्रकरणी ५० हजार रुपये भरपाई किंवा दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा असा आदेश नुकताच ऊल्हासनगर चोप्रा न्यायालयाने दिला असल्याची माहिती समोर आली आहे,
राहटोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ साक्षी करंदुले आणि तात्कालिन उपसरपंच चेतन बनकर यांच्या मध्ये मागील काळात ग्रामपंचायत कार्यालयात विकास कामांच्या मुद्यावर वाद झाला होता,
ऊपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांच्या समोर हा वाद सुरू असताना, साक्षी करंदुले यांनी बदलापुर ग्रामीण पोलीस ठाणे गाठत, उपसरपंच चेतन बनकर यांच्या विरोधात त्यांचा विनयभंग झाला असल्याची तक्रार दाखल केली होती, या वेळी बदलापुर ग्रामीण पोलिसांनी तातडीने चेतन बनकर यांच्यावर भादवी कलम ३५४ आणि ईतर कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती,
या मध्ये चेतन बनकर यांना ऊल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चेतन बनकर यांची जामिनावर सुटका केली होती,याच अनुषंगाने मागील दोन ते तीन वर्षांपासून हा खटला ऊल्हासनगर न्यायालयात सुरू होता,चेतन बनकर यांच्या बाजूने वकिल श्री प्रशांत रजपूत तर फिर्यादी यांच्या कडून सरकारी वकील कामकाज पाहत होते,
मागिल दोन ते तीन महिन्यांपासून सदर खटल्याची दोन्ही कडिल साक्षी पुराव्यांच्या आधारे सुनावणी सुरू असुन आज दिनांक ३० जानेवारी रोजी ऊल्हासनगर न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी खटल्याचा निकाल देताना चेतन बनकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे, या वेळी वकिल श्री प्रशांत रजपूत यांनी तातडीने भरपाईची मागणी केली असल्याने न्यायालयाने खोटी तक्रार दाखल केल्या प्रकरणी सौ साक्षी करंदुले यांना ५० हजार रुपये भरपाईचे आदेश दिले असून भरपाई न दिल्यास एक महिना कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे आपल्या निकालात म्हटले आहे,
या वेळी आपल्यावर विनयभंगा सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याने साक्षी करंदुले यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे चेतन बनकर यांनी म्हटले आहे.