ताज्या घडामोडी

ठाणे जिल्ह्यात जिजाऊ संघटनेच शक्ती प्रदर्शन,,, राजकीय गोटात एकच खळबळ,,, भिवंडी लोकसभा निवडणूक कोणाला जड जाणार ?

देशभरात लोकसभा निवडणुकीची नांदी होताच सर्व राजकीय पक्षांनी आप आपले फासे फेकण्याची तयारी सुरू केली आहे, महाराष्ट्र राज्यात राजकीय परिस्थिती अतिशय बिकट आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले असल्याने संपूर्ण राजकीय समीकरण बिघडल असल्याची परिस्थिती आहे, आता सर्वात महत्त्वाची लढत आता कोकणातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात बघायला मिळणार आहे, सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि कॉंग्रेस पक्ष,आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहेत तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांची आघाडी आगामी निवडणुक लढवणार आहे, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे गेले दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील हे विद्यमान खासदार आहेत तर त्यांच्याकडे केंद्रीय मंत्री पदाची सूत्रे आहेत,

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकुण सहा विधानसभा असुन या मध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात भिवंडी तालुक्यातील दिघाशी,आनगाव,पडघा,खारबाव,पडघा सिटी,कोण सिटी,वाडा तालुक्यातील काही गाव येत असुन हा मतदारसंघ अनुसूचित जमाती साठी राखीव आहे या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे,त्याच प्रमाणे शहापूर विधानसभा मतदारसंघात शहापूर तालुका, आणि वाडा तालुक्यातील काही भाग येत असुन हा मतदारसंघ देखील अनुसूचित जमाती साठी राखीव आहे, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे, तर भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भिवंडी तालुक्यातील महानगर पालिकेतील काही वार्ड तसेच खोणी सिटी,शेलार सिटी,काटई सिटी,कारिवली सिटी,हा परिसर लोकसभा मतदारसंघात येतात,हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा आहे, भिवंडी पुर्व विधानसभा मतदारसंघात महानगर पालिकेतील बराचसा भाग तर भिणार,सझा परिसर येतो, या ठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार आहेत, तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कल्याण डोंबिवली महापालिकेतील जवळपास २८ वार्ड आणि काही गावांचा समावेश होतो, या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे, त्याच प्रमाणे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मुरबाड तालुका, कल्याण तालुक्यातील टिटवाळा,नाडगाव, अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव, बदलापुर, आणि बदलापूर नगरपालिका हद्दीतील सर्व परिसर हा भिवंडी लोकसभा मतदारसंघात येत असुन या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे किसन कथोरे हे आमदार आहेत,

या सर्व विधानसभा मतदारसंघातील परिसरात आमदार किसन कथोरे यांचा पगडा असल्याचे बोलले जाते, आमदार किसन कथोरे हे आधी कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागील दोन टर्म भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, पुर्वी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात असल्याने आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ तालुक्यातील मतदारांशी आमदार किसन कथोरे यांचा थेट आणि प्रेमाचे संबंध आहेत, या मुळे या पुर्वी भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा २००९ पासून कॉंग्रेस कडे असताना सन २०१४ च्या निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन स्वतः मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून पुन्हा निवडून आले, आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले कपिल पाटील यांना खासदार म्हणून निवडून येण्यास आमदार किसन कथोरे यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते,

त्या नंतर सन २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत देखील आमदार किसन कथोरे हे मुरबाड मतदार संघातून निवडणूक जिंकली आणि किसन कथोरे यांच्याच प्रयत्नाने कपिल पाटील पुन्हा खासदार झाले असल्याची चर्चा सुरू झाली होती कपिल पाटील आता केंद्रीय मंत्री देखील आहेत, परंतु मागील काळात आमदार किसन कथोरे आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यातील संबंध फारसे चांगले राहिले नसल्याच चित्र निर्माण झाल आहे, मुरबाड विधानसभा क्षेत्र हे भिवंडी लोकसभा मतदारसंघात येत असल्याने विकास कामांच्या श्रेयासाठी आमदार विरुद्ध खासदार असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळत आहे,

त्याच प्रमाणे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध निवडणुकीत आणि राजकीय निर्णयात खासदार देखील कपिल पाटील हे ढवळाढवळ करत असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांच्या कडून केला जात आहे,आता तर या दोन्ही लोकप्रतिनिधीं मधिल वाद अधिकच चिघळला असल्याने हे दोन्ही नेत्यांनी एकत्र कोणत्याही कार्यक्रमात येण्याचे बंद केले आहे, नुकतेच काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बदलापुर शहरात करण्यात आले होते,

परंतु शहरामध्ये असताना देखील आमदार किसन कथोरे हे या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत, या मध्ये दोन्ही नेत्यांची मर्जी सांभाळताना स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे,आता लोकसभा निवडणुक लवकरच जाहीर होणार असुन अद्याप आमदार आणि खासदार यांचे मनोमिलन झाले नसल्याने, आमदार किसन कथोरे हे या निवडणुकीत पुन्हा कपिल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना चांगलाच झटका देतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे,

कारण आमदार किसन कथोरे यांच्या मदती शिवाय कपिल पाटील हे खासदार म्हणून निवडून येणे कठीण आहे ही बाब अगदिच सत्य आहे,सन २०२४ मधिल भिवंडी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आघाडी कडून कॉंग्रेस पक्षालाच उमेदवारी मिळणार असल्याचे समजते,

या आघाडीतुन सुरेश टावरे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे, तर भारतीय जनता पक्षाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघ आमदार किसन कथोरे लढण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती, परंतु कपिल पाटील यांच दिल्ली दरबारी वजन असल्याने भिवंडी लोकसभा निवडणुकीच तिकीट कपिल पाटील यांनाच मिळणार असल्याचे बोलले जात आहे,

परंतु आता या निवडणुकीत जिजाऊ संघटनेने मुसंडी मारलेली असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी देखील भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, या साठी दिनांक २७ जानेवारीला वाशिंद या ठिकाणी जिजाऊ संघटनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता, मेळाव्यात हजारोंच्या संख्येने जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती,

या वेळी पत्रकारांशी बोलताना निलेश सांबरे यांनी कपिल पाटील यांच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विकास कामां बाबत उघड ऊघड आपल्या प्रतिक्रिया देऊन, गेल्या दहा वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात अतिशय बिकट परिस्थितीत निर्माण होऊन अराजकता पसरली असल्याचे वक्तव्य करत, या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचे रोजगार उपलब्ध झाले नसल्याचे म्हटले आहे,त्याच प्रमाणे गेल्या दहा वर्षांत एकही रेल्वे स्थानक सुशोभित करण्यात आले नसुन,गरज असताना देखील कल्याण कसारा मार्गावर एक देखील लोकल गाडी वाढवली नसल्याचे सांगुन, निवडणूकी पुरत मतदारांना नमन करणाऱ्या लोकप्रतिनिधीं विरोधात भूमिका घ्यावी लागणार असल्याचे निलेश सांबरे यांनी म्हटले आहे,

त्याच प्रमाणे पक्षातील ज्या आमदारांनी कार्यकर्त्यांनी खासदारकी साठी मदत केली त्यांनाच गाडण्याच काम सुरू असल्याचा गंभीर आरोप निलेश सांबरे यांनी केला आहे, या मुळे आपल्याला संधी मिळाली तर आपली कोणत्याही राजकीय पक्षाकडुन निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे सांबरे यांनी सांगितले आहे, या मुळे कदाचित निलेश सांबरे यांना कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास कपिल पाटील यांना ही लोकसभा निवडणूक अतिशय जड जाणार आहे हे मात्र नक्की,कारण निलेश सांबरे हे आमदार किसन कथोरे यांचे अतिशय जवळेचे निकटवर्तीय असुन आमदार किसन कथोरे यांनीच कपिल पाटील यांना शह देण्यासाठीच निलेश सांबरे यांना रिंगणात उतरवले असल्याची चर्चा होताना दिसत आहे,

त्या मुळे खरच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचा विजयी रथ रोखणार की भारतीय जनता पक्ष निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर करणार किंवा ही निवडणूक आता कोणाला जड जाणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.