महाराष्ट्रभूषण अण्णा हजारे “, यांना जीवन आधार फौंडेशनच्या वतीने “जिवित महापुरुष” जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित.!
" ( तात्यासाहेब सोनवणे यांजकडून ,राळेगणसिद्धी २५ डिसेंबर २०२३)

तीर्थरूप “अण्णा हजारे”, यांच्या समर्पित जीवन संघर्षाने प्रेरित होऊन नव्या पिढीला भारतातील महान समाजसेवक पद्मश्री बाबूराव किसन हजारे यांच्या जीवनसंघर्षातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी, जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स राष्ट्रीय सचिव मा. श्री. विक्रांत पाटील याच्या उद्देशाने व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर धोंडीराम पोवार, यांच्या संमतीने आणि संकल्पनेतून भारतरत्न अट्टलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी “अण्णांच्या”, ” गाव तेथे तीर्थ”, कर्मभूमी राळेगणसिद्धी येथे जाऊन जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सच्या वतीने “अण्णा हजारे “यांना “जिवित महापुरूष जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.यावेळी राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. प्रतिभा शंकर पोवार, राष्ट्रीय सचिव विक्रांत पाटील, तेलंगणा प्रदेशाध्यक्ष श्रीनिवास सोमडी, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण गायकवाड, मुंबई उपनगर भांडूप महिलाध्यक्षा सौ. उषाताई काकडे, सदस्या दिपाली कदम, सुकन्या स्वरा पोवार यांची उपस्थित होती
. स्वातंत्र्य सेनानी, भ्रष्टाचार विरोधी,जनलोकपाल जनक, “अण्णा हजारे”यांची देहू, आळंदी,पुणे, अहमदनगर,आझाद मैदान, रामलीला,जंतरमंतरवर,जन आंदोलने जागतिक पातळीवर गेली. अण्णांनी भारत सरकारला हादरा देऊन संसदेत जनलोकपाल व माहितीचा अधिकार-२००५, कायदा लागू करण्यास भाग पाडले.कर्मयोगी, निस्वार्थी “अण्णांसारखी”, देशाची संपत्ती जगली पाहिजे. युवकांना आदर्श निर्माण झाला पाहिजे. जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स कार्यक्षेत्र भारत देश या आमच्या संस्थेचा राष्ट्रीय अभिनव उपक्रम म्हणजे,भारतातील आजमितीला कार्यरत आसलेले माणिक मोती उचलून त्यांना जिवित महापुरूष जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या कर्मभूमी जावून प्रदान करुन, त्यांचे अनुकरणीय कार्य व ध्येय भारतभर भ्रमण करून जनतेपर्यंत पोचवणे होय. याच कार्याचे पहिले पुष्प आमच्या संस्थेने “अण्णानां” वाहिले आहे. अण्णांचा, “जिवित महापुरूष” चरित्र धडा शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकात घ्यायला हवा असे आम्हाला वाटते. “जिवित महापुरूष जीवन गौरव पुरस्कार” त्यांचे व्यसन मुक्ती आदर्श जीवन,उच्चशिक्षण,अहिंसावाद व समाज सुधारणा,श्रमदानातून जलसंधारण, खेडी सुधारली पाहिजे हा “अण्णांचा संदेश” भारतभर पोचविण्याचा विश्वास डॉ.श्री शंकर पोवार व मा. श्री. विक्रांत पाटील साहेब यांनी जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स च्या माध्यमातून’अण्णांना”, दिला.ठाणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुखश्री. तात्यासाहेब सोनवणे यांनी संपादित केलेल्या लढाई कोरोनाशी,कोविड-१९, विशेषांकाला “अण्णांनी”,शुभेच्छा देताना मोठे व्हा. म्हणून आशिर्वाद दिले. इस. सन. १९८० ते २०२०,समर्पित जीवनाची संघर्ष गाथा,अर्थात जनतेच्या हक्कासाठी गाव, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर केलेली, अरविंद केजरीवाल, प्रशांतभूषण,आशा प्रत्येक भारतीयांनी “मी अण्णा” म्हणून टोपी घालून केलेली जनआंदोलनं, उपोषण,शासकीय ठराव, केंद्र सरकार , राज्य सरकारातील मुख्यमंत्री, शरद पवार, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, ग्रामविकास मंत्री आर. आर.(आबा) पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, यांच्याशी पत्रव्यवहार,पाना पानावर आसमंत साडलेला, “सत्यमेव जयते”,संग्रहालय पहाताना नवी चेतना मिळाली हे मात्र नक्की.! डॉ. शंकर पोवार,राष्ट्रीय महिलाध्यक्षा सौ. प्रतिभाताई पोवार,सचिव श्री. विक्रांत पाटील,व जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सच्या अभिनव उपक्रमात सामाजिक समतेच्या उत्थानासाठी झोकून देणाऱ्या, पदाधिकारी,महिला पदाधिकारी, सोशल मीडिया यांचे सर्वदूर कौतुक होत आहे. !