राज्यातील सरकार कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपयशी ठरले असल्याने राज्य सरकार बरखास्त करण्याची महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांची मागणी
महामहिम राज्यपालांना निवेदन सादर,,

,,
महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या गोळीबाराच्या घटना तसेच विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनीवर तसेच महिला व सामान्य नागरिकांवरील हल्ले, या मुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, या मुळे सध्याचे राज्य सरकार हे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अपयशी ठरले असल्याने हे सरकार बरखास्त करण्याची मागणी कॉंग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांनी राज्यपालांकडे केली आहे,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पाटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सह कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी महामहिम राज्यपाल यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन सादर केले आहे,
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर व संत आणि थोर समाजसुधारकांची भुमी असुन महाराष्ट्राला मोठी परंपरा लाभली आहे, या राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातही महाराष्ट्राने मोठी प्रगती केली आहे, देशात आघाडीचे राज्य म्हणून नावलौकिक मिळवलेले आहे, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही महाराष्ट्र उत्तम राज्य म्हणून गणले जात होते, परंतु अशा महान महाराष्ट्रातील सामाजिक जिवण विस्कळीत करण्याचे,व राज्यातील शांतता भंग करण्याचे काम केले जात असुन त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे,
गेल्या एक महिन्यात महाराष्ट्रातील घडलेल्या घटना चिंताजनक आहेत, शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे, पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पोलिसांच्या ऊपस्थितीत प्राणघातक हल्ला करण्यात आला, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशन मध्ये दोन लोकांवर गोळीबार केला,२२ जानेवारी रोजी मिरारोड येथे धार्मिक तणाव निर्माण करून, सरकारने बुलडोझर फिरवून गरीबांची घरे तोडली, जळगावचे भाजपचे नगरसेवक मोरे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली, यवतमाळ शहरात भरदिवसा एका तरुणीची हत्या करण्यात आली, सध्या लहान लहान मुलांकडे शस्त्र सापडत आहेत, अवैध शस्त्रांचा मोठ मोठा साठा राज्यात येत आहे, राज्यात महिला सुरक्षित नाहीत, लोकप्रतिनिधीं सुरक्षित नाहीत हे अतिशय गंभीर आहे, राज्यातील सरकार कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अपयशी ठरले आहे, या मुळे हे सरकार बरखास्त करावे अशा प्रकारची आमची मागणी असुन, राष्ट्रपती महोदय यांच्या कडे आमच्या भावना कळवाव्यात ही विनंती , अशा प्रकारचे निवेदन नानाभाऊ पाटोले यांनी राज्यपालांकडे सादर केले आहे,