डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चित्रशिल्प कला जाणीवपूर्वक जोपासल्या : सोमनाथ गायकवाड
मुक्ती महोत्सवाला वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळेने प्रारंभ

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-: आधुनिक भारताचे संविधान शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी जीवनातील सर्वच ज्ञान पैलू जाणीवपूर्वक अभ्यासले व तह्यात विद्यार्थी राहणे पसंद केले.आपल्या बाल वयापासून एकतारीवर कबीराचे दोहे,तबला-हार्मोनियम वादन तर आत्मसात केले.त्यांनी रेखाटलेले तथागत बुद्धाचे चित्र-शिल्प हि सुरेखाटलेच परंतु जीवनाच्या अखेर टप्प्यावर ते व्होयोलिन वाजवायला शिकले.बाबासाहेबांनी ज्ञानप्राप्तीची आपली ओढ कायम ठेवली चित्रशिल्प कला जाणीवपूर्वक जोपासल्या कला मानवी जीवनाला आकार देतात असे प्रतिपादन वारली चित्रकार सोमनाथ गायकवाड केले.
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्स समिती मुक्तीभूमी येवलाच्या वतीने १३ व्या मुक्ती महोत्सवाचे उदघाटन आज येथे संपन्न झाले त्यावेळी गायकवाड बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राहुल वरकड हे होते.प्रास्ताविक मुक्ती महोत्सवाचे मुख्य प्रवर्तक एस.डी.शेजवळ यांनी केले.सामाजिक कार्यकर्ते सुरेश खळे,विकास वाहुळ हे ह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुक्ती महोत्सव २०२३ अंतर्गत विविध उपक्रममांतर्गत व्याख्याने,कार्यशाळा,करिअर मार्गदर्शन,मुक्ती काव्य-गीत,शाहिरी जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन साईल पानपाटील यांनी केले.आभार महेश विंचू यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य संयोजक
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय लोककवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका,येवला पदाधिकारी,अनु.जाती व नवबौद्ध शासकीय मुलांची निवासी शाळा बाभूळगाव-येवला येथील शिक्षक
मिलिंद पानपाटील,महेश विंचू,श्रीरंग सागरे, संजय सोनवणे,शिक्षिका अनुसया येळकर,वसुंधरा रणमाळे,ताई चव्हाण सतीश बनसोडे,समीर गांगुर्डे,सुरज कांबळे यांनी परिश्रम घेतले.वारली चित्र कला प्रशिक्षण कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.