दादर रेल्वे स्थानकाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे नाव द्या- दलित पॅंथर
आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 11 मार्च 2024 पासून दलित पॅंथर निदर्शने व धरणे आंदोलन छेडणार -दादासाहेब खडसे

मुंबई /अमरावती (प्रतिनिधी) मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसह दलित शोषित पिढीत अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला रोकथांब करण्यासाठी तसेच दलित अनुसूचित जाती जमातीच्या समाज बांधवांच्या समस्या व प्रश्न अडगडीत पळून आहेत,या समस्या तातडीने महाराष्ट्र सरकारने व प्रशासनाने तातडीने सोडविण्यात यावे यासाठी दलित पँथर ने यल्गार पुकारलेला आहे. दलित पँथर राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब खडसे, दलित पँथरच्या केंद्रीय सदस्य तथा विदर्भ प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक ताराताई रेवस्कर, दलित पॅंथर चे विदर्भ प्रदेश संघटक सरफुद्दीन पठाण, दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सुरेशराव सोनावणे, दलित पँथर च्या मुंबई विभाग महासचिव स्वप्नालीताई सोनावणे, दलित पँथर चे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष बालाजी पात्रे,आदींच्या प्रमुख नेतृत्वामध्ये उपस्थितीमध्ये आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 11 मार्च 2024 सकाळी 10:30वाजता पासून दलित पँथर च्या वतीने आमरण उपोषण आंदोलन, निदर्शने व धरणे आंदोलन छेडण्यात येत आहे.