ताज्या घडामोडी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा,,

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी सोडण्याचा निर्णय झाला असल्याने महाविकास आघाडी कडून आता सुरेश ( बाळ्या मामा) म्हात्रे हे निवडणूक लढवणार आहेत,

तर भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचा उमेदवार म्हणून विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी मतदार संघात प्रचार देखील सुरू केला आहे,

मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी कडून कोणाला तिकीट मिळणार या बाबत चर्चेला उधाण आले होते, भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार संघ असल्याने ही उमेदवारी महाविकास आघाडी कडून कॉंग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे या साठी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठींवर मोठ्या प्रमाणात दबाव देखील आणला होता,

कॉंग्रेस मधुन माजी खासदार सुरेश टावरे आणि कॉंग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी या मतदारसंघातील उमेदवारीवर दावा केला होता,

परंतु या वेळी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी देखील या निवडणुकीत ऊडी घेतल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण पुर्णपणे बदलुन गेले आहे, मध्यंतरी निलेश सांबरे यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन करुन आपले शक्ती प्रदर्शन केले होते, त्या नंतर आपली कोणत्याही राजकीय पक्षाकडुन निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे जाहीर केले असताना निलेश सांबरे यांना कोणत्या पक्षातुन उमेदवारी मिळणार या कडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते,

दरम्यान निलेश सांबरे यांनी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती, या मध्ये निलेश सांबरे यांना कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार अशी देखील चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती, निलेश सांबरे यांनी देखील त्यांना कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते, निलेश सांबरे यांची जिजाऊ संघटना गेली १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात कार्यरत असुन विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याने जिजाऊ संघटनेचा जनाधार देखील मोठा आहे, या मुळे कॉंग्रेस पक्षाकडुन त्यांना उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित झाले होते, परंतु काहिच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भिवंडी लोकसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली असल्याचे जाहीर केले असल्याने, निलेश सांबरे यांनी जिजाऊ विकास पार्टीच्या नावाने निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे,

मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर महाविकास आघाडी कडून सुरू असलेली जागा वाटपाची चर्चा फिसकटली असल्याने बाळासाहेब आंबेडकर यांनी ठिक ठिकाणी स्वतंत्र उमेदवार घोषित केले आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात देखील वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला नसला तरी निलेश सांबरे यांना पाठींबा जाहीर केला असल्याने आता या मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलले आहे ठाणे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा मतदार देखील मोठ्या प्रमाणात असल्याने निलेश सांबरे यांना याचा कीती फायदा होतो आणि आघाडीच्या उमेदवाराला याचा किती तोटा होतो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे ,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.