ठाण्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना जाहीर पाठिंबा…

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखालीला तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे लोकसभा महा विकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला..
देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रम करीत आहे महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाही कडे जात आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले, व्यक्ती स्वातंत्र्य दिले व लोकशाहीचा पुरस्कार केला,
आज हे सर्व पायदळी तुडविले जात आहे, 2024 साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुतही शेवटची निवडणूक ठरेल अशी शंका लोकांना वाटते ही परिस्थिती देखील आज निर्माण झाली दिसते,
ही परिस्थिती बदलून ठाणे शहर जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडवावे याकरिता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली, युवा शहराध्यक्ष साईनाथ खरात,युवा उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष नारायण पांडे, महिला जिल्हाध्यक्ष रंजनाताई कदम महिला उपाध्यक्ष अध्यक्ष दीपाताई जाधव,व इतर ठाणे शहर जिल्यातील शिष्टमंडळाने ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांना भेटून जाहीर पाठिंबा दिला.