ताज्या घडामोडी

बदलापूर मध्ये २७ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन,,

बदलापूर !! कुळगाव बदलापुर शहरामध्ये दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी बदलापुर पश्चिम अजय राजा हॉल मध्ये महाविकास आघाडीच्या महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापुर शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दिली आहे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दिनांक २० मे २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदरच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, या वेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे, या वेळी दिनांक २० मे रोजी होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार असुन, मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील तसेच वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी तसेच पदाधिकारी उपस्थित राहुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना शह देण्याच्या दृष्टीने हा मेळावा अतिशय महत्त्वाचा समजला जात असुन, कोणत्याही परिस्थितीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून येणार नाही अशा प्रकारची रणनिती या वेळी ठरवण्यात येणार आहे, मेळाव्यात बदलापुर शहर तसेच ग्रामीण परिसरातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, मेळाव्यात आता कशा प्रकारची रणनिती आखली जाते आणि मेळाव्याला महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळणार आहे हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.