बदलापूर शहर काँग्रेस पर्यावरण विभाग कार्यकारिणी जाहीर,, अनेक तरुणांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश,,,
ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न

ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव बदलापुर शहर काँग्रेस पर्यावरण विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण बैठक बदलापुर पुर्व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडली, या वेळी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी दिला आहे,
या वेळी बदलापूर शहर काँग्रेस पर्यावरण विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अनेक तरुणांनी प्रदीप रोकडे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला, या वेळी ठाणे जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष भरत कारंडे, बदलापुर शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान ठाणे जिल्हा पर्यावरण विभाग पदाधिकारी सतिश रणदिवे तसेच पर्यावरण विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वेळी बदलापूर शहर अध्यक्ष पदी हर्षल विश्वनाथ कदम, उपाध्यक्ष रोशन रमेश मुडिमाडु, सरचिटणीस अनिष भालचंद्र कांबळे, अनिल सुनील खानेकर, सहसचिव पदि जितेंद्र शांताराम सोनावणे, रोहित रमेश मुडिमाडु, सुमित संजय झाके,संघटक पदि गितेश भालचंद्र कांबळे यांची नियुक्ती ठाणे जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी जाहीर केली आहे,