राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रिय कार्यकारणीवर सचिव म्हणून श्रीकांत नायक यांची निवड

.
मुंबई(प्रतिनिधी) राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रिय कार्यकारिणीवर सचिव म्हणून श्रीकांत नायक यांची नियुक्ती
राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई येथील मराठी पत्रकार भवन आझाद मैदान मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली.*
पत्रकार परिषदेस संबोधित करतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद दिवसेंदिवस महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील झपाट्याने वाढत आहे सर्वच समाजघटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षा मध्ये दाखल होत आहे.
*”We Are Republican “आम्ही रिपब्लिकन”* हे अभियान संपूर्ण देशात पक्षाचे वतीने प्रभावीपणे सुरू आहे या अभियानास सर्वच स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा व समर्थन मिळत आहे.समाजातील जेष्ठ प्रतिष्ठीत व्यक्ती वकील, इंजिनियर,प्राध्यापक,डॉक्टर, साहित्यिक ,शाहीर ,कवी, गायक, उद्योजक, व्यापारी ,कलाकार देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात सामील होऊन समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहे. पक्षाचा विस्तार सर्वदूर व्हावा यासाठी समस्त नेते/पदाधिकारी/ कार्यकर्ते यांनी जीवापाड मेहनत परिश्रम घेतल्यानेच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सर्व समाज घटकांत आपले वेगळे स्थान निर्माण करून शकला ही अभिमानास्पद अशीच बाब आहे.
*श्रीकांत नायक यांचा संपर्क महाराष्ट्रात तर आहेच परंतू महाराष्ट्राबाहेर देखील असल्याने पक्ष बांधणी साठी ते उपयोगीच पडणार असल्याची खात्री पक्षाला असल्यानेच त्यांच्यावर केंद्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे* असेही अण्णासाहेब कटारे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.
!! राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज –
होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने कंबर कसली असून पक्षाचा प्रभाव असलेले विधानसभेचे मतदारसंघ लढविणार अजून आमचे उमेदवार लवकरच उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा युतीचा प्रस्ताव महाविकास आघाडी व महायुतीकडे दाखल आहे अनेक वेळा चर्चा /बोलणी देखील झाली आहे परंतु आजपर्यंत कुठलाही निर्णय नाही राज्यातील युती अथवा आघाडीला ही निवडणूक सोपी नाही.तरीही केवळ आपआपल्या संबंधातील लोकांना उमेदवारी देण्याची दोन्हीही बाजू कडून चढाओढ सुरू आहे.राज्यातील दलित ,बौद्ध ,मुस्लिम ,ओ.बी.सी., भटके विमुक्त आदिवासी समूहाला निवडणुकीच्या बाहेर ठेवण्याची कुटील नीती ही दोन्हीही बाजू कडून घेतली जाते की काय अशी स्थिती आहे.
राज्यातील गरीब घटकांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी येथील प्रस्थापित सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्ष फारसा अनुकूल नाही केवळ या घटकांची एक गठ्ठा मते घेऊन त्यांना भूलथापा मारून त्यांची निवडणुकीत मते पळविण्याचे (हायजॅक) कुटील व खोडसाळ राजकारण होतांना दिसत आहे. एकीकडे मराठा आंदोलनाने डोके वर काढले आहे तर दुसऱ्या बाजूने ओबीसी समाज देखील आव्हानाची भाषा करू लागला असल्याने जाती-जातीत संघर्ष उभा राहणे छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू महाराज ,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला परवडणारे नाही.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष गरीब घटकांचे नेतृत्व करतांना त्यांना समाजात मानसन्मान प्राप्त करून देण्यासाठी व राजकारणात/समाजकारणात देखील मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सज्ज झाला असल्याचेही अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी सांगितले.
या पत्रकार परिषदेस पक्षाचे
*केंद्रीय महासचिव पोपटराव सोनवणे, केंद्रीय सचिव श्रीकांत नायक, राष्ट्रीय सल्लागार नंदकुमार जोशी, मुंबई प्रदेश प्रभारी वसंतराव वाघमारे, मराठवाडा अध्यक्ष संतोषजी मोकळे, युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपिन कटारे,महाराष्ट्र जन संपर्कप्रमुख सचिन भाऊ नांगरे, मुंबई अध्यक्ष अनंत पांचाळ, उपाध्यक्ष बाबासाहेब खरात, नाका कामगाराध्यक्ष सागर पिल्ले, मुंबई प्रदेश सचिव विश्वास कांबळे, औरंगाबाद संदीप गायकवाड, नाशिक जिल्हा ग्रामीण नेते शिवाजीराव गायकवाड, युवा आघाडी हितेश भालेराव, प्रशांत कटारे,*
आदी उपस्थित होते.